Pune Porsche Accident : रक्ताचा नमुना बदलण्याची आयडीया कोणाची, आरोपीच्या आईचा मोठा खुलासा

Pune Porsche Accident Latest Update : कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईने रक्ताचे नमुने कोणाच्या सांगण्यावरून बदलेले याबाबत खुलासा केला आहे
Porsche Accident Shivani Agarwal
Porsche Accident Shivani AgarwalSarkarnama

Pune  News : कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईला देखील पोलिसांनी अटक केली असून कोर्टाने बुधवार पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या चौकशीत शिवानी अगरवाल यांनी रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड केल्याची कबुली दिली असून मुलाच्या नमुन्यांऐवजी स्वतःचे नमुने सादर केले असल्याचे सांगितले आहे. तसेच हे कोणाच्या सांगण्यावरून केले याची कबुली देखील दिली आहे. 

कल्याणीनगर अपघातात प्रकरणामध्ये सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने रुग्णालयातील डस्टबीन मध्ये फेकल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. त्यानंतर आरोपी निर्दोष सिद्ध व्हावा म्हणून आरोपीच्या आईचे रक्ताचे नमुने घेतले गेल्याची माहिती समोर आली. आता पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक केली असून, तिनेही खळबळजनक खुलासा केला आहे. महिलेचा दावा आहे की ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच तिला सॅम्पल बदलण्याची आयडिया दिली होती. असं खुलासा पोलीस तपासामध्ये केला असल्याचे समोर आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अल्पवयीन आरोपीच्या आईने जबाबामध्ये रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला तिच्या मुलाच्या रक्ताऐवजी स्वतःच्या रक्ताचा नमुना म्हणून देण्यास सांगितले होते. मात्र, डॉक्टरांनी असे का सांगितले, या प्रश्नाचे उत्तर ही महिला देऊ शकली नाही. मात्र सर्व कल्पना असताना डॉक्टरांच्या सांगण्यावरून तिने रक्त का दिले ? याचा उलगडा मात्र महिलेला करता आला नाही.

Porsche Accident Shivani Agarwal
Pune Porsche Accident : 'कार'नामा करणाऱ्या बाळाच्या आई - वडिलांना बुधवारपर्यत पोलिस कोठडी

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या आईवर पोलिसांची फसवणूक आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. याआधी पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हलनोर आणि हॉस्पिटलचे कर्मचारी अतुल घाटकांबळे यांना रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तावडे, हलनोर आणि घाटकांबळे यांच्यासह अल्पवयीन आई-वडील यांनी रक्ताचे नमुने फेरफार करण्याचा कट रचला असून, यासाठी आरोपींमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.

Porsche Accident Shivani Agarwal
Arunachal Pradesh Assembly Election : लोकसभेच्या निकालाआधी ‘राष्ट्रवादी’ने उधळला गुलाल; भाजपचा ऐतिहासिक विजय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com