Karuna Sharma Released Beed Sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

करुणा शर्मा तुरुंगाबाहेर पडल्या, पण काहीच नाही बोलल्या..

(karuna Sharma Released) प्रसार माध्यमांच्या प्रश्नांच्या भडीमारावर नो काॅमेंट्स एवढे एकच उत्तर देत त्या आपल्या सहकाऱ्यांसह वाहनात बसून निघून गेल्या.

सरकारनामा ब्यूरो

बीड ः परळीत दाखल होऊन खळबजनक खुलासा करण्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा स्वतःच अडकल्या. ६ सप्टेंबर रोजी परळीत आलेल्या करुणा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि त्यांची थेट तुरुंगात रवानगी झाली.

परळीत घडलेल्या या हाय व्होल्टेज ड्राम्याची चर्चा राज्यभरात झाली. पण यात शर्मा यांच्याच अडचणींमध्ये अधिक वाढ झाली. आज सोळाव्या दिवशी शर्मा यांना अंबाजोगाई न्यायालयाने जामीन मंजुर करून त्यांची तुरुंगातून सुटका केली. खळबळजनक दावे, आरोप आणि खुलासा करण्यासाठी परळीत आलेल्या करुणा शर्मा तुरुगांतून बाहेर पडल्यानंतर मात्र काहीच बोलल्या नाही.

प्रसार माध्यमांना नो काॅमेंट्स एवढेच त्यांचे उत्तर होते. पाच सप्टेंबरला परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा रोजी करुणा शर्मा यांना अंबाजोगाईच्या अपर सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायाधीशसापत्नेकर यांनी शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर करुणा शर्मा यांची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.

या कालावधीत त्यांच्या जामिन अर्जावर तीन वेळा सुनावण्या झाल्या. अखेर आज शर्मा यांना जामीन मिळाला. दुपारी चार वाजता जामिनाचे निकालपत्र पोचले. त्यानंतर तांत्रिक प्रक्रीयेनंतर त्या पंधरा रात्र तुरुंगात काढल्यानंतर १६ व्या दिवशी कारागृहातील न्यायालयीन कोठडीच्या बाहेर पडल्या.

प्रसार माध्यमांच्या प्रश्नांच्या भडीमारावर नो काॅमेंट्स एवढे एकच उत्तर देत त्या आपल्या सहकाऱ्यांसह वाहनात बसून निघून गेल्या. राज्याच्या राजकारणात एक वादळ निर्माण करणाऱ्या करुणा शर्मा यांनी न्यायालयीन कोठडीतला संपुर्ण काळ विनातक्रार पुर्ण केला.

राजकीय नेत्यांना न्यायालयीन किंवा पोलिस कोठडी मिळाली की छातीत कळ निघणे, प्रकृती बिघडणे असा कोणाताही प्रकार करुणा शर्मा यांच्या बाबतीत घडला नाही याबद्दलही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आपल्या आरोप आणि दाव्यांनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या करुणा शर्मा तुरूगांतून बाहेर पडल्यानंतर मात्र शांत होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT