राजीव सातव यांचे शासकीय रुग्णालयाचे स्वप्न पुर्ण करणार..

राजीव सातव (Let Rajiv Satav) यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता सातत्याने समाजाची सेवा केली. (Education Minister Varsha Gaikwad)परंतु कोरोना आजारामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला
Let. Rajiv Satav birth anniversary
Let. Rajiv Satav birth anniversarySarkarnama
Published on
Updated on

हिंगोली : कोरोनासारख्या आजारामुळे स्व. खासदार राजीवभाऊ सातव यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

हिंगोली तालुक्यातील चिंचोली येथे स्व. खासदार राजीव सातव यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे उद्घाटन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. राजीव सातव यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता सातत्याने समाजाची सेवा केली. परंतु कोरोना आजारामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला, आपणही त्यांना मुकलो आहोत.

आपले आरोग्य महत्वाचे आहे, ते प्रत्येकाने जपले पाहिजे. राजीव सातव यांच्या दूरदृष्टीमुळे सामाजिक न्याय व इतर विविध योजनाच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याला त्यांनी पुढे नेले. आता त्यांचे अपुर्ण राहिलेले काम, स्वप्न आपल्याला पुर्ण करायचे आहेे.

त्यांचे हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. या माध्यमातून आरोग्याच्या अनेक सुविधांचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना होणार आहे. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी विविध विकासात्मक सामाजिक कार्यक्रम राबविणे हीच आपणा सर्वांच्या माध्यमातून त्यांना श्रंध्दाजली ठरेल.

Let. Rajiv Satav birth anniversary
करुणा शर्मा यांची पंधरा दिवसांनी सुटका ; जामीन मंजूर

त्याचाच एक भाग म्हणून हे महाआरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या. यावेळी जंतनाशक दिन मोहिमेचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला. शिबिरामध्ये रक्तदान तसेच कोविड लसीकरण, कोविडची अँटीजेन व आरटीपीसीआर तपासणी, रक्त तपासणी, महिलांचे थॉयराईड तपासणी यासह विविध तपासण्या करण्यात येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com