Sandipan Bhumare
Sandipan Bhumare Sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

शिंदे गट ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत : भुमरेंनी घेतला पुढाकार!

सरकारनामा ब्यूरो

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेत मागील अनेक वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. मात्र महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर युती तुटली. मात्र महापालिकेत भाजपसोबत युती असली तरी येथे शिवसेनेचे प्राबल्य होते. मागच्या अडीच वर्षांपासून महापालिकेवर प्रशासकराज असले तरी शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या मर्जीनुसार कामे होत होती. आता शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर शिवसेनेच्या दोन गटांत वर्चस्वासाठी लढाई सुरू झाली आहे.

लवकरच महापालिकेच्या निवडणूका होणार आहेत. शिंदे गटाने महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संदीपान भुमरे यांची निवड केली आहे. भुमरे यांनी सोमवारी विकासकामासंदर्भात आढावा बैठक ठेवली आहे. शहराचा पाणीप्रश्न आपण प्राधान्याने सोडवू, असे भुमरे यांनी म्हंटले होते. महापालिका जिंकायची असेल तर शहराचा पाणीप्रश्न प्राधान्याने सोडविणे आवश्यक आहे. शिंदे गटाकडूनही याच विषयाला प्राधान्य दिले जात असल्याचे, सूत्रांनी सांगितले. यामुळे आता महापालिकेवर वर्चस्व मिळवून शिंदे गट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देणार असल्याचे बोलले जात आहे.

या बैठकीची महापालिका प्रशासनाकडून विशेष तयारी सुरू करण्यात आली आहे. पालकमंत्री भुमरे यांच्यासमोर प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत विकासकामांचे सादरीकरण केले जाणार आहे. कोणत्या कामावर किती खर्च केला जात आहे? सध्या काम कोणत्या स्थितीत आहे? याची माहिती दिली जाणार आहे. १६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, सफारी पार्क, रस्ते, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक व उद्यान यासह इतर कामांचे यावेळी सादरीकरण केले जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT