Pm Modi,Mp Omraje Nimabalkar
Pm Modi,Mp Omraje Nimabalkar Sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

मोदींनी केलेले पाप कुठल्याच पवित्र नदीत धुवून निघणार नाही..

सरकारनामा ब्यूरो

उस्मानाबाद : शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेण्याचे पाप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असुन तुमचे पाप कोणत्याच पवित्र नदीत धुवुन निघणार नसल्याची जळजळीत टीका शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.

मोदी यांच्या आर्शिवादानेच सोयाबीनचे दर कोसळत असुन केंद्र सरकारने १२ लाख टन जनुकीय बदल केलेल्या सोयाबीन डीओसीच्या आयातीला दिलेली परवानगी शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचा आरोपही निंबाळकर यानी केला आहे.

मोदी सरकारच्या अनेक निर्णयामुळे शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागत आहे, हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताऐवजी व्यापाऱ्यांचा प्राधान्याने विचार करत असल्यामुळेच शेतकऱ्यावर ही वेळ आली. सोयाबीन दरामध्ये होत असलेली घट पाहता सोयाबीन उत्पादकांना त्याचा मोठा फटका बसत आहे.

मागील पंधरा दिवसांपूर्वी १० ते ११ हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीनचे भाव आता सहा हजारावर आले आहेत. एका बाजुला यंदा अवेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मोठा फटका बसला, उत्पन्नात घट झाली आहे. एकरी उताराही घटला, तर दुसरीकडे पुन्हा दराच्या घसरणीचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

सोयाबीन पिकातून उत्पन्नाची आशा असतानाच केंद्र सरकारने आयातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडशी आलेला घासच हिरावुन घेतला. सोयाबीनचे भाव यंदा दहा हजाराच्यावर राहतील असा अंदाज व्यक्त होत होता. त्याप्रमाणे भावही चढे राहिले होते, जेव्हा केंद्राने आयातीचा निर्णय जाहीर करण्याचा विचार चालु केला त्याच दिवसापासुन आतापर्यंत हळुहळु दर कोसळत असल्याचे चित्र आहे.

अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी टाकण्याचे महापाप भाजपच्या सरकारने केले आहे. हे पाप देशाच्या कोणत्याही पवित्र नदीत धुवुन निघणार नाही, असा टोलाही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT