Sharad Pawar, Jitendra Awhad, ketki chitale
Sharad Pawar, Jitendra Awhad, ketki chitale sarkarnama
ब्लॉग

केतकी चितळेला काय म्हणायचे ? जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण

सरकारनामा ब्युरो

-जितेंद्र आव्हाड

पुरोगामी महाराष्ट्राच्या सगळ्या महामानवांना शिव्या द्यायच्या आणि काही लोकांनी उठायचं आणि म्हणायचं निरागस आहे, सोडून द्या. ह्याला काय म्हणायचे? केतकी चितळे बद्दल थोडी वस्तुस्थिती समोर आणायचा प्रयत्न.

केतकी चितळे हि 34 वर्षांची आहे 29 वर्षांची नाही. ठाण्यात दाखल गुन्ह्यात केतकी हीच्याकडे तपास पूर्ण झाल्यावर स्वतःहून पोलिसांनी तिची पोलीस कोठडी न मागता न्यायालयीन कोठडी मागितली आहे. (ketki chitale latest news)

त्यानंतर त्या प्रकरणात ईतर ठिकाणी जरी गुन्हे नोंद असले तरी तिचा राज्यातील अन्य कोणत्याही पोलिसांनी तिचा ताबा मागितला नाही अथवा तिला "त्या आक्षेपार्ह पोस्ट" फेसबुकवर अपलोड केल्याबद्दल अटक केली नाही आहे. ही पण एक समंजसपणाची कृतीच म्हणावी लागेल.

2020 मध्ये अगोदरच केतकी चितळे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि महात्मा फुले यांच्या बद्दल अत्यंत अश्लील अश्लाघ्य आणि निषेधार्य पोस्ट अपलोड केल्या होत्या. त्यावेळी म्हणजे 2020 मध्ये केतकी जरी 32 वर्षांची असली तरी नासमज आहे असे समजून पोलिसांनी कदाचित अटक केली नसेल परंतु आवश्यक तपासा नंतर तिच्या विरुद्ध पुरावा मिळाल्याने दोषारोपपत्र दाखल कारण्याची परवानगी रबाळे पोलिसांनी मागितली आहे.

आता आज केतकीला 2020 मध्ये तिने वरील प्रमाणे इतिहासातील महामानवांबद्दल आणि दलित समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह अश्लील आणि बेताल लिखाण केल्याबद्दल अटक केली आहे. कारण आमच्या माहिती नुसार केतकीने या सर्व पोस्ट मीच फेसबुकवर share केल्या असून त्याबद्दल मी ठाम असून त्या डिलीट करणार नसल्याचे पोलिसांना काय न्यायालयात पण स्पष्ट सांगितले आहे.

या अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि महात्मा फुले यांच्या बद्दल अत्यंत हिणकस लिखाण शेअर करून देखील त्या वेळी कदाचित पोलिसांनी तिला अटक केली नाही तिच्याकडून येणारी गुळमुळीत उत्तरे घेऊन तिला एक प्रकारे माफी करून अटक न करता तिच्याविरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्याचा उपचार केला होता. त्यामुळे तपासात तिने अशा आक्षेपार्ह पोस्ट share केल्या तरी काही होत नाही.

पोलिसांना काही कारवाई करण्याचा अधिकार नाही आणि त्या पोस्ट मी डिलीट करणार नाही असा अविर्भाव घेतला होता. पोलिसांनी याबद्दल न्यायालयात अहवाल पण सादर केल्याचे समजते.

म्हणजे 2020 मध्ये या 32 वर्षाच्या निरागस अभिनेत्रीला पुरेशी समज देऊन देखील जर तिच्या दुष्कृत्याबद्दल तिला यत्किंचित पण चूक वाटत नसेल तर याच भारताला राज्यघटना देणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि समाजाला स्वातंत्र्य समता आणि बंधुतेची शिकवण देणाऱ्या महात्मा फुले या महामानवांच्या प्रतिमेस जाणीवपूर्वक लांछन लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आज 34 वर्षाच्या या निरागस बालिकेला पुन्हा तशाच स्वरूपाचा गुन्हा करण्याचे बळ नक्कीच मिळाले नसते.

कायदा किंवा पोलीस एक दोन वेळ संधी नक्कीच देतात हो.पण आपण त्या संधीसाठी लायक नसेल आणि पोलीस किंवा कायद्याने समजूतदारपणाच्या घेतलेल्या भूमिकेला माझे काय वाकडे केले पोलिसांनी असा समज करून पुन्हा जाणीवपूर्वक त्या चुका नव्हे गुन्हा करण्याचा चंग कोणी बांधला असेल तर पोलीस तरी काय करणार तुम्ही विचार करा. या निरागस बालिकेच्या फेसबूक वॉलवर जाऊन जरा बघा केतकीने काय गुण उधळले आहेत.

शिवाजी महाराज.महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर,रमाई ,व आंबेडकरी जनता ह्यांच्या बद्दल जे काही लिहिले आहे ते निरागस बालिकेनी लिहिले आहे, असे म्हणाऱ्यांचे मन कुठल्या विचारांनी भरले आहे हे स्पष्ट होते अर्थात गांधी हत्या करणाऱ्या नथूरामचे समर्थन करणाऱ्यांकडून काय अपेक्षा करायच्या. (ketki chitale Controversial statement on Sharad Pawar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT