नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात; ईडीच्या आरोपपत्राची विशेष कोर्टाकडून दखल

मलिक यांनी डी कंपनीशी संबंधित असलेल्या व्यक्तीसोबत मनी लाँड्रिंगसाठीच गोवावाला कंपाऊंडच्या अफरातफरीचा कट रचला.
Nawab Malik
Nawab Malik sarkarnama

मुंबई : डी कंपनीशी संबध आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणी (Money Laundering Case) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीनं (ed) मोठा झटका दिला आहे.

मलिक यांच्याविरोधात ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल मुंबईच्या विशेष न्यायालयानं घेतली आहे. त्यामुळे मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. (nawab malik latest news)

"नवाब मलिक यांचे दाऊद टोळीच्या सदस्यांशी थेट संबंध होते याचे सकृतदर्शनी पुरावे दिसतायत, त्यामुळे हा खटला पुढे सुरु ठेवण्यासाठी हे पुरावे पुरेसे आहे," असे न्यायालयानं म्हटलं आहे.

मलिक या प्रकरणात स्वत: सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. २१ एप्रिल २०२२ रोजी ईडीनं मलिक यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोपपत्रात तपासयंत्रणेनं मलिकांविरोधात मनी लॉन्ड्रींगमध्ये समाविष्ट असल्याचा आरोप केलेला आहे.

कुर्ला येथील गोवावाला कंपाउंडमधील ताबा मिळविण्यासाठी नवाब मलिक, कुविख्यात गुन्हेगार डॅान दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर आणि तिचा बॉडीगार्ड सलीम पटेल यांच्यात अनेक बैठका झाल्याचे पुरावे ईडीनं आरोपपत्रात दिले आहेत. विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या आरोपपत्राची दखल घेतली आहे.

Nawab Malik
पंधरा दिवसापूर्वी शिवसेनेत गेलेले मनसेचे पंजाबी पुन्हा स्वगृही परतणार

"नवाब मलिक यांनी डी कंपनीशी संबंधित असलेल्या हसिना पारकर, सलीम पटेल, सरदार खान यांच्यासोबत मनी लाँड्रिंगसाठीच गोवावाला कंपाऊंडच्या अफरातफरीचा हा कट रचला. ज्यातनं या सर्वांनी मोठा आर्थिक घोटाळा करून बेहिशेबी मालमत्ता जमवली. त्यामुळे पीएमएलए कायद्यानुसार हे सर्व आरोपी या गुन्ह्याशी थेट संबंधित असल्यानं शिक्षेसाठी पात्र आहेत. त्यानंतर ती भाडेपट्टी अस्लमच्याच नावावर करण्यात आली," असे आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर न्यायाधीश राहुल रोकडे यांनी स्पष्ट केलं आहे.

Nawab Malik
विरोधकांनो, जास्त लोड घेऊ नका..मी मनसेतच!

हसीना पारकरचा मुलगा अलिशान यांनं कबूल केलंय की हसीना पारकर ही 2014 मधील तिच्या मृत्यूपर्यंत दाऊद इब्राहिमचे इथले सर्व आर्थिक व्यवहार सांभाळायची. हसीना पारकरने सलीम पटेलच्या साथीनं गोवावाला कंपाऊंडाच वाद मिटवला होता. त्यानंतर ही सारी मालमत्ता नवाब मलिकांना विकण्यात आली होती, असे आरोपपत्रात म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com