Jagan Mohan Reddy File Photo
ताज्या बातम्या

मोठी बातमी : मुख्यमंत्री जगनमोहन संपूर्ण मंत्रिमंडळालाच देणार डच्चू

आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे गुजरात पॅटर्न राबवणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

हैदराबाद : भाजपने गुजरातमध्ये (Gujarat) विजय रूपानी यांना हटवून भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री (Chief Minister) बनवलं होतं. नंतर नव्या मंत्रिमंडळात (Cabinet) आधीच्या एकाही मंत्र्याला स्थान देण्यात आलेलं नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मोठा धक्का दिला होता. आता आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jagan Mohar Reddy) हे गुजरात पॅटर्न राबवणार आहेत. ते संपूर्ण मंत्रिमंडळालाच डच्चू देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आंध्रचे ऊर्जामंत्री बालिनेली श्रीनिवास यांनी याबाबत संकेत दिले आहेत. राज्यात लवकरच मंत्रिमंडळ फेरबदल होईल, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री जगनमोहन हे संपूर्ण मंत्रिमंडळालाच डच्चू देऊन नवीन चेहऱ्यांनी संधी देतील, असाही गौप्यस्फोट श्रीनिवास यांनी केला आहे. जगनमोहन यांनी 2019 मध्ये मंत्रिमंडळाची स्थापना करताना अर्धा कालावधी झाल्यानंतर फेरबदल केला जाईल, अशी घोषणा केली होती. ही घोषणा ते प्रत्यक्षात उतरवतील, अशी चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री विद्यमान मंत्रिमंडळातील 80 टक्के मंत्र्यांना वगळतील आणि महत्वाच्या मंत्र्याना कायम ठेवतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर श्रीनिवास म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले आहे की ते मंत्रिमंडळात 100 टक्के बदल करतील. पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांचा उपयोग 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीसाठी करण्याता त्यांचा मानस आहे. मुख्यमंत्री जी जबाबदारी सोपवतील ती मी पार पाडेन.

जगनमोहन यांच्या सरकारला डिसेंबरमध्ये अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांनी सरकारच्या अर्धा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा शब्द दिला होता. सर्वांना समान संधी मिळावी, यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली होती. आता ते त्यांचा शब्द खरा करून दाखवणार आहेत. दसरा ते संक्राती या काळात मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मंत्रिमंडळ फेरबदलासाठी मुख्यमंत्री जगनमोहन हे पक्षाचे खासदार, मंत्री, आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांशी ते या आठवड्यात संपर्क साधणार आहेत. नवीन मंत्रिमंडळासाठी आमदारांची निवड करण्यात पक्षाच्या सर्वच नेत्यांना सहभागी करुन घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मंत्रिमंडळ आणि पक्षाचे पदाधिकारी अशा दोन सक्षम टीम अशाव्यात, असा मुख्यमंत्र्यांची विचार आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT