Rana Gurjit Singh
Rana Gurjit SinghFile Photo

पंजाबमध्ये राजकीय भूकंप घडवण्यामागे काँग्रेसचा सर्वांत श्रीमंत आमदार

पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाला आहे.

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात एकच खळबळ उडाली आहे. सिध्दूंपाठोपाठ एका कॅबिनेट मंत्र्यांसह चार पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या समर्थनार्थ राजीनामे दिले आहेत. दरम्यान, सिद्धू यांच्या राजीनाम्यामागे काँग्रेसचे सर्वांत श्रीमंत आमदार राणा गुरजितसिंग (Rana Gurjit Singh) असल्याचे समोर आले आहे.

राणा गुरजितसिंग यांचा नुकताच मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला आहे. ते काँग्रेसचे सर्वांत श्रीमंत आमदार आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते. नंतर त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लिनचिट देण्यात आली होती. गुरजितसिंग यांच्या मंत्रिमंडळ समावेशाला सिद्धू यांनी आधीच जाहीर विरोध केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वाळू खणन गैरव्यवहारामध्ये गुरजितसिंग यांच्या परिवारातील सदस्यांची नावे होती. या गैरव्यवहारामुळे राज्याला 25 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याऐवजी एका दलित आमदाराला मंत्री करावे, अशी मागणी काँग्रेसच्या 6 आमदारांनी सिध्दू यांच्याकडे मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी केली होती. परंतु, गुरजितसिंग यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडल्याने सिद्धू भडकले. यामुळे सिद्धूंनी थेट टोकाचे पाऊल उचलत प्रदेशाध्यक्षपदाचाच राजीनामा दिला, असे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेस हाय कमांडकडून सिध्दू यांच्या राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. उलट हाय कमांडकडून सिध्दूंना आधी राज्याच्या पातळीवरच वादविवाद मिटवण्याचा सल्ला दिल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे सध्यातरी सिध्दू यांचं पद शाबूत राहणार आहे. मात्र, याबाबत सिध्दू यांची भूमिका स्पष्ट झालेली नव्हती. अखेर सिद्धू यांनी मौन सोडून सविस्तर उत्तर दिले आहे.

Rana Gurjit Singh
काँग्रेस नेतृत्वाने राजीनामा मागे घेण्याचा आदेश दिला अन् सिद्धू म्हणाले...

सिध्दू यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेश सरचिटणीस योगिंदर धिंग्रा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्याआधी कॅबिनेट मंत्री रजिया सुलताना, खजिनदार गुलजार इंदर चहल व प्रशिक्षण विभागाचे सरचिटणीस गौतम सेठ यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. सिध्दू यांच्या समर्थनार्थ या नेत्यांनी राजीनामे दिल्यानं काँग्रेसची डोकेदुखी वाढत चालली आहे. सिध्दू यांना पाठिंबा देण्यासाठी आणखी काही नेते राजीनामे देऊ शकतात, अशी चर्चा आहे.

Rana Gurjit Singh
मोठी बातमी : शपथ घेतल्यानंतर 48 तासांतच कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा

सिद्धू यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दोन ओळीचा राजीनामा पाठवला आहे. तडजोड केल्यानंतर माणसाच्या व्यक्तिमत्वाचा ऱ्हास सुरू होते. मी पंजाबचे भविष्य आणि कल्याण यासोबत तडजोड करणार नाही. यामुळे पंजाब काँग्रेस प्रदेश समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मी काँग्रेस सेवा करीत राहीन, असे सिद्धू यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. यामुळे ते काँग्रेस सोडणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com