Mamata Banerjee File Photo
ताज्या बातम्या

ममतांच्या विरोधातील प्रचारातून भाजपच्या खासदार गायब

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत.

सरकारनामा ब्युरो

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) तीन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका होत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या भवानीपूर (Bhawanipur) मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. भाजपने (BJP) ममतांच्या विरोधात प्रियांका टिबरेवाल (Pryinaka Tibrewal) यांना उभे केले आहे. आज या प्रचाराची सांगता झाली पण भाजपच्या खासदार लॉकेट चटर्जी या प्रचारात न उतरल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

भवानीपूर मतदारसंघात भाजपकडून जोरदार प्रचार सुरू होता. या एकात मतदारसंघात भाजपने 3 खासदार आणि 8 आमदार कामाला लावले आहेत. परंतु, भाजपच्या स्टार प्रचारक खासदार लॉकेट चटर्जी या प्रचारापासून दूर राहिल्या. तृणमूलमधून राजकीय इनिंग सुरू केलेल्या चटर्जी यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी ममतांच्या विरोधात प्रचार केल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असून, त्यांच्या घरवापसीचीही चर्चा सुरू झाली आहे.

याबद्दल तृणमूलचे प्रवक्चे कुणाल घोष यांनी लॉकेट चटर्जींचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, भवानीपूरमध्ये प्रचार न केल्याबद्दल स्टार प्रचारक लॉकेट चटर्जी यांचे आभार आणि स्वागत. भाजपने अनेक वेळा विनंती करुनही तुम्ही प्रचारात उतरला नाहीत. एक मित्र म्हणून तुम्ही जिथे असाल तिथे यश मिळो, अशी माझी सदिच्छा आहे. जग हे अतिशय छोटे आहे. तुम्ही राजकीय इनिंग जिथून सुरू केली तिथे पुन्हा याल, अशी अपेक्षा आहे.

भाजपच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल या 41 वर्षांच्या आहेत. त्या कोलकता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. त्यांनी 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. खासदार बाबुल सुप्रिया यांच्या विधी सल्लागार म्हणून प्रियांका काम करीत होत्या. सुप्रियो यांनीच त्यांना सक्रिय राजकारणात आणून त्यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवला होता. तेव्हापासून त्यांची भाजपमधील वाटचाल वेगाने सुरू आहे.

पारंपरिक मतदारसंघ असलेल्या भवानीपूरला सोडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदिग्राममध्ये जाण्याचा निर्णय चांगलाच भोवला होता. राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आले खरे पण त्यांना तेथे पराभव पत्करावा लागला. आता त्यांना पुन्हा निवडणूक लढवून विजयी होत मुख्यमंत्रिपद टिकवावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा भवानीपूरला पसंती दिली आहे. पण भाजपनंही ममतांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे. राज्य भाजपने सहा जणांची नावे केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली होती. यातील भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रियांका टिबरेवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT