Captain Ashok Kharat case SIT Formed Sarkarnama
ताज्या बातम्या

Ashok Kharat News: कॅप्टन खरातचा मुखवटा टराटरा फाटणार! तपासाची जबाबदारी धडाकेबाज IPS अधिकाऱ्याकडे!

Captain Ashok Kharat case SIT Formed Tejaswi Satpute: मंत्रतंत्र, दैवी शक्ती यांच्या आडून अनेक महिलांचा विश्वास संपादन करुन त्यांच्यावर अत्याचार करण्याचा आरोप खरात याच्यावर आहे.

Mangesh Mahale

Nashik Crime News: नाशिकमधील तथाकथित अंकशास्त्रज्ञ, राजकीय नेत्यांचा निकटवर्तीय असणारा कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याला बलात्काराच्या गंभीर आरोपांवरून अटक झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

काल (बुधवारी) त्याला अटक करण्यात आली आहे. तपासात मोठे मोठे धक्कादायक खुलासे समोर येत आहे. मंत्रतंत्र, दैवी शक्ती यांच्या आडून अनेक महिलांचा विश्वास संपादन करुन त्यांच्यावर अत्याचार करण्याचा आरोप खरात याच्यावर आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. विरोधकांनी हे प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले आहे.

खरात प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या तपासाची एसआयटी (SIT) ची स्थापना केली आहे. या पथकाच्या प्रमुख म्हणून तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी सातपुते यांनी सातारा,सोलापूरचे पोलीस अधिक्षक म्हणून काम केले आहे. सातपुते यांच्याकडे फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचाही तपास देण्यात आला होता.

  1. गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने बुधवारी पहाटे कारवाई करत अशोक खरात याला अटक केली.

  2. त्याला न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

  3. पोलिसांनी कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला.

  4. पेन ड्राइव्हमध्ये तब्बल 58 व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर येत असून, त्यातील मजकुराची सखोल चौकशी सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT