Assam Election: भाजपची पहिली यादी जाहीर: मुख्यमंत्री सातव्यांदा मैदानात: काँग्रेसमधून आलेल्या बोरदोलोईंनाही उमेदवारी, 11 विद्यमानांचा पत्ता कट

BJP released first candidate list Assam Assembly Election 2026: उमेदवारी जाहीर करताना सामाजिक संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या यादीत ज्येष्ठ, युवा आणि महिला नेत्यांना समतोल संधी दिली आहे.
BJP
BJP sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली: आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ८८ जणांनी उमेदवारी दिली आहे. यात विद्यमान ११ आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे.

तर काल (बुधवारी) काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले प्रद्युत बोरदोलाई यांना दिसपुर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 25 दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन बोरा यांनाही तिकीट देण्यात आले आहे.

अनेक दिग्गज नेता, विद्यमान मंत्री आणि आमदार यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. अनेक मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत,

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ही यादी जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आदी सदस्य उपस्थित होते.

BJP
Narendra Mehta : थेट पंतप्रधान कार्यालयाकडून CM फडणवीसांना भाजप आमदारावर कारवाईचा आदेश; तब्बल 400 कोटींची स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा आरोप

सामाजिक संतुलन

भाजपने ब्रह्मपुत्र आणि बराक दोन्ही क्षेत्रात उमेदवार उतरवले आहेत. उमेदवारी जाहीर करताना सामाजिक संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या यादीत ज्येष्ठ, युवा आणि महिला नेत्यांना समतोल संधी दिली आहे.

पाच महिलांना संधी

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात अजंता नेओग, नीलिमा देवी, ज्योत्स्ना कलिता आदींचा समावेश आहे.

गुवाहाटी येथील सर्व विधानसभा मतदार संघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. येथील सर्व विधानसभा मतदारसंघात BJP ने नवे चेहरे दिले आहेत, हे शहरातील राजकारणात होत असलेल्या बदलाचे संकेत आहे.

BJP
Pune ZP News: पहिल्याच दिवशी ZP विरोधकांची खेळी! सत्ताधारी फिरले 'दारोदारी'

विद्यमान मंत्र्यांना पुन्हा संधी

पीयूष हाजरिका (जागीरोड)

जयंत मल्ल बरुआ (नलबाड़ी)

अशोक सिंघल (ढेकियाजुली)

अजंता नेओग (गोलाघाट)

चंद्रमोहन पाटोवारी (तिहू)

रूपेश गोवाला (डूमडूमा)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com