Manish Tiwari, Shashi Tharoor and Kapil Sibal
Manish Tiwari, Shashi Tharoor and Kapil Sibal File Photo
ताज्या बातम्या

शशी थरूर संतापले अन् म्हणाले, सिब्बलच खरे काँग्रेसी!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू असतानाच काँग्रेसमधील बंडखोरांच्या जी-23 (G-23) गटाचे नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी थेट गांधी कुटुंबीयांवर निशाणा साधला होता. 'आम्ही जी-23 आहोत, जी हुजूर-23 नाही', असं वक्तव्य सिब्बल यांनी केलं होतं. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सिब्बल यांच्या घरासमोर धुडगूस घातला होता. आता पक्षाचे नेते शशी थरूर (Shashi Tharoor) हेसुद्धा सिब्बल यांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत.

सिब्बल यांच्या विधानानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट सिब्बल यांचं दिल्लीतील घर गाठत आंदोलन केलं होत. सिब्बल यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली होती. तसेच घराबाहेरील सिब्बल यांच्या कारचे नुकसानही करण्यात आले होते. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 'लवकर बरे व्हा' असे फलकही हातात घेतले होते. तसेच, पक्षातून बाहेर पडा, राहुल गांधी जिंदाबाद अशा घोषणाही देण्यात आल्या होत्या.

काल सिब्बल यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. यावर काँग्रेस नेते मनीष तिवारी ट्विट करुन संताप व्यक्त केला होता. ही गुंडगिरी नाही तर काय आहे, असा सवालही त्यांनी केला होता. यावर आज शशी थरूर म्हणाले की, हे लज्जास्पद सिब्बल हे खरे काँग्रेसी आहेत. त्यांनी पक्षासाठी अनेक कायदेशीर लढाया लढल्या आहेत. आपला लोकशाही पक्ष असून, त्यांना काय म्हणायचे आहे ते आपण ऐकून घ्यायला हवी. तुम्हाला ते पटत नसेल तर तुम्ही त्याच्याशी असहमत होऊ शकतो. आपले प्राधान्य पक्ष भक्कम करुन भाजपला रोखण्याला हवे.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी सिब्बल यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला होता. सिब्बल यांना कोणतीही संघटनात्मक पार्श्वभूमी नसताना सोनिया गांधी यांनी त्यांना केंद्रीय मंत्री केलं. तुम्हाला ज्या पक्षानं ओळख दिली, त्या पक्षाला बदनाम करू नका, असा टोला माकन यांनी लगावला आहे. तर छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंह देव यांनीही सिब्बल यांना खडे बोल सुनावले होते. सिब्बल हे दिशाभूल करत आहेत. पक्षात सोनिया गांधीच निर्णय घेतात. सिब्बल यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला हे माहित नाही, हे दुर्दैवी आहे, असं देव म्हणाले होते.

पंजाबमध्ये राजकीय संकट निर्माण झाले असून, यातून मार्ग काढण्यासाठी पक्ष नेतृत्वाने तातडीने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. यावरुन काँग्रेसमधील फेरबदलांसाठी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिणारा जी-23 हा बंडखोरांचा गट पुन्हा सक्रिय झाला आहे. या गटातील नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला अध्यक्ष नसल्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT