Rahul Gandhi, Priyanka Gandhi and Navjot Singh Sidhu File Photo
ताज्या बातम्या

पद राहो अथवा जावो..! सिद्धूंचा राहुल अन् प्रियांका गांधींसाठी संदेश

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. यानंतर मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी सिद्धू यांची भेट घेतली असून, सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्यास राजी झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सिद्धू यांनी आज ट्विट करीत गांधी भावंडांना संदेश दिला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या बरोबर सुरू असलेल्या वादात सिद्धू यांनी गांधी भावंडांनी पाठबळ दिले होते. यानंतर सिद्धू हे प्रदेशाध्यक्ष झाले होते तर अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्री राजीनामा द्यावा लागला होता. आता सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी आपण गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ असल्याचे दाखवून दिले आहे. सिद्धू यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, मी गांधीजी आणि शास्त्रीजींच्या तत्वांना अनुसरेन. पद असो अथवा नसो मी कायम राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत उभा राहेन. माझा पराभव करण्याचा कितीही प्रयत्न नकारात्मक शक्तींनी केला तरी पंजाब आणि पंजाबी नागरिकांना विजयी करून दाखवेन.

पंजाबमध्ये राजकीय संकट निर्माण झाले असून, यातून मार्ग काढण्यासाठी पक्ष नेतृत्वाने तातडीने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. पक्षाचे प्रभारी हरीश चौधरी तातडीने पंजाबमध्ये दाखल झाले आहेत. याचबरोबर मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी सिद्धू यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. सिद्धू यांनी काही निवडींना आक्षेप घेतला आहे. यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. यानंतर सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्यास राजी झाले आहेत. असे असले तरी या वादात माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग पक्ष सोडण्याच्या उंबरठ्यावर आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

चन्नी यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक महत्वाच्या निुयक्त्या केल्या होत्या. यातील काही नियुक्त्यांना सिद्धूंचा आक्षेप आहे. याचबरोबर मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनाही त्यांचा विरोध आहे. सिद्धू यांचे सल्लागार मोहम्मद मुस्तफा यांनीही सिद्धू हे राजीनामा मागे घेतील याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले आहेत की, काँग्रेस नेतृत्वाच्या म्हणण्याच्या पलिकडे सिद्धू जाणार नाहीत. हे पक्ष नेतृत्वालाही माहिती आहे. ते काय अमरिंदरसिंग नाहीत. अमरिंदरसिंगांनी कधीच काँग्रेस आणि पक्ष नेतृत्वाचा विचार केला नाही. कधीकधी सिद्धू भावनेच्या भरात निर्णय घेतात.

सिध्दू यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेश सरचिटणीस योगिंदर धिंग्रा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्याआधी कॅबिनेट मंत्री रजिया सुलताना, खजिनदार गुलजार इंदर चहल व प्रशिक्षण विभागाचे सरचिटणीस गौतम सेठ यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. सिध्दू यांच्या समर्थनार्थ या नेत्यांनी राजीनामे दिल्यानं काँग्रेसची डोकेदुखी वाढत चालली आहे. सिध्दू यांना पाठिंबा देण्यासाठी आणखी काही नेते राजीनामे देऊ शकतात, अशी चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT