'नथुराम गोडसे जिंदाबाद'वर भाजपचे खासदार वरूण गांधी म्हणाले...

महात्मा गांधींच्या जयंतीदिनीच त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा उदोउदो केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Varun Gandhi
Varun Gandhi
Published on
Updated on

मुंबई : महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) जयंतीदिनीच त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा (Nathuram Godse) उदोउदो केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ ट्विटरवर 'नथुराम गोडसे जिंदाबाद' असा हॅशटॅग ट्रेंड होत असल्याने खळबळ उडाली आहे. यावर भाजप नेते व खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत हा ट्रेंड करणाऱ्यांना सुनावले आहे.

गांधीच्या जयंतीदिनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. देशभरात गांधी जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम होत असताना ट्विटरवर अचानक नथुराम गोडसे जिंदाबाद हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागल्याने अनेकांना धक्का बसला. भाजप नेते वरूण गांधी यांनीही याला आक्षेप घेत सगळ्यांना सुनावले. ते म्हणाले की, भारत हा आधीपासूनच अध्यात्मिक महासत्ता राहिला आहे. आपल्या देशातील अध्यात्मिकतेला महात्मा गांधींनीच आकार दिला. त्यांनी दिलेले नैतिकतेचे धडे आपली सगळ्यात मोठी शक्ती आहेत. नथुराम गोडसे जिंदाबाद असे ट्विट करणारे आपल्या बेजबाबदारीतून सगळ्या देशाची मान शरमेने खाली घालत आहेत.

Varun Gandhi
महागाईने होरपळलेल्या जनतेला मोदी सरकारचा आणखी एक धक्का

महात्मा गांधींची हत्या 30 जानेवारी 1948 करण्यात आली. गांधी हत्येच्या 10 दिवस आधीही त्यांच्या हत्येचा एक अयशस्वी प्रयत्न झाला होता. भारताची फाळणी आणि पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याच्या निर्णयाची या प्रयत्नामागे पार्श्वभूमी होती. गांधीजींच्या प्रार्थना सभेत 20 जानेवारी 1948 ला बाँब फेकण्यात आला होता. त्यावेळी मदनलाल पहावा नावाच्या शरणार्थ्याने फेकलेला बाँब गांधीजींपासून थोड्याच अंतरावर फुटला होता. यात कोणाला दुखापत झाली नव्हती पण सभेत गोंधळ उडाला. नंतर मदनलालने दिलेल्या कबुलीजबाबावरून तो कट होता हे समोर आले होते.

Varun Gandhi
प्रदेशाध्यक्षांना वैतागून माजी मुख्यमंत्री देणार धक्का

या कटात सहभागी असलेल्यांची नावे त्याने सांगितली होती. नथुराम गोडसे आणि नारायण आपटे कटाचे सूत्रधार होते तर विष्णू करकरे, शंकर किश्तया आणि दिंगबर बडगे यांचा त्यात सहभाग होता. त्यानंतर नथुराम गोडसेने कोणाच्याही मदतीशिवाय मी गांधीहत्या करणार, असे गटातील सहकाऱ्यांना सांगितले होते. दरम्यान, यासाठी एक दिवस आधी नथुराम आणि आपटे 29 जानेवारी 1948 रोजी दिल्लीत पोचला होता. प्रार्थनेसाठी येत असलेल्या गांधीजींवर गोडसेने 30 जानेवारी 1948 रोजी गोळ्या झाडल्या. यातच गांधीजींची प्राणज्योत मालवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com