Rohini Court File Photo
ताज्या बातम्या

धक्कादायक : कारागृहात बसूनच गँगस्टरनं घडवलं न्यायालयात गँगवॉर

दिल्लीतील रोहिणी न्यायालयात न्यायालयात गँगवॉर भडकल्यानं पोलिसांनाही गोळीबार करावा लागला होता. यामध्ये एका कुख्यात गँगस्टरसह तिघांचा मृत्यू झाला होता.

सरकारनामा ब्युुरो

नवी दिल्ली : दिल्लीतील रोहिणी न्यायालयात (Firing At Rohini Court) न्यायालयात गँगवॉर (Gangwar) भडकल्यानं पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. यामध्ये एका कुख्यात गँगस्टरसह तिघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिहार कारागृहात (Tihar Jail) कैद असलेला एक गँगस्टर (Gangster) मोबाईलच्या माध्यमातून या गँगवॉरवर लाईव्ह देखरेख ठेवत होता. आशियातील सर्वांत मोठ्या आणि अतिसुरक्षित तिहार कारागृहातून त्याने मोबाईलच्या माध्यमातून हत्या घडवून आणल्याने खळबळ उडाली आहे.

गोगी गँग अन् टिल्लू गँगमध्ये मागील अनेक वर्षांपासून गँगवॉर सुरू आहे. यामध्ये दोन्ही बाजूकडील 25 हून अधिक गुंड मारले गेले आहेत. गोगी गँगचा म्होरक्या असलेला जितेंद मान उर्फ गोगी याच्यासह त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी मार्च 2020 मध्ये अटक केली होती. गोगी मोस्ट टेड असल्यानं त्याला अटक करून पोलिसांना मोठं यश मिळाल्याचं मानलं जात होतं. सध्या तो तिहार तुरूंगात होता.

एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी गोगीला 24 सप्टेंबरला रोहिणी न्यायालयात आणण्यात आलं होतं. यावेळी दोन गुंड वकिलाच्या वेशभूषेत आले होते. त्यांनी केलेल्या गोळीबारात गोगीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं केलेल्या गोळीबारात दोन्ही हल्लेखोर मारले गेले. त्यापैकी एकाचं नाव राहुल असून त्याच्या डोक्यावर 50 हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.

आता या गँगवॉरमागे टिल्लू गँगचा म्होरक्या टिल्लू ताजपुरीया हा असल्याचं समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टिल्लू हा राहुल त्यागी आणि जगदीप जग्गा या हल्लेखोरांच्या सातत्याने संपर्कात होता. गोगी याला मारण्यासाठी पाठवलेल्या या हल्लेखोरांकडून टिल्लूला मिनिटा-मिनिटाला अपडेट मिळत होते. तिहार कारागृहात असलेला टिल्लू हा लाईव्ह देखरेख करीत त्यांना सूचनाही करीत होता. तिहारसारख्या अतिसुरक्षित कारागृहात टिल्लूकडे मोबाईल आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हल्लेखोर कुठपंर्यत पोचले, ते कधीपर्यंत न्यायालयात पोचतील, असे अपडेच टिल्लू हा घेत होता. न्यायालयात गेल्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त असल्याचे हल्लेखोरांनी टिल्लूला कळवले. आपले लोक तेथून जिवंत निसटणे शक्य नसल्याची बाब टिल्लूच्या लक्षात आली. त्यामुळे त्याने घाबरुन कॉल कट केला. नंतर त्याने त्याच्या दोन सहकाऱ्यांना कॉल केला. ते रोहिणी न्यायालयाच्या पार्किंगमध्ये होते. त्याने तेथून पलायन करण्याची सूचना सहकाऱ्यांना केली, असे सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT