उलटा प्रवास : केंद्रात मंत्री राहिलेल्या नेत्याला भाजपनं केलं राज्यात मंत्री

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने उत्तर प्रदेशात मंत्रिमंडळ विस्तार केला आहे.
Jitin Prasada
Jitin Prasada
Published on
Updated on

लखनौ : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने (BJP) उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. यामध्ये सात नव्या मंत्र्यांना स्थान मिळाले. त्यापैकी एक मंत्रिपद काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून (Congress) भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांना मिळाले आहे. जितिन प्रसाद हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील नेत्यांपैकी एक होते. भाजपने त्यांची पदावनती केली, अशी टीका सुरू झाली आहे.

योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल झाला. या विस्तारात सात नव्या मंत्र्याना स्थान मिळाले आहे. यात प्रसाद यांच्यासह संगीता बलवंत बिंड, पलटूराम, संजीवकुमार गौर, दिनेश खाटिक, छत्रपाल गंगवार आणि धर्मवीर प्रजापती यांचा समावेश आहे. यातील गंगवार, प्रजापती आणि बिंड हे ओबीसी समाजातील आहेत. खाटिक आणि पलटूराम हे अनुसूचित जातीतील तर गौर हे अनुसूचित जमातीतील आहेत. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जातीय समीकरणे साधण्यावर भाजपने भर दिला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात प्रसाद हेच एकमेव ब्राह्मण मंत्री आहे. उत्तर प्रदेशातील ब्राम्हण चेहरा म्हणून प्रसाद यांची ओळख आहे. ते माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते. या वर्षी जून महिन्यामध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तीन महिन्यांतच त्यांना योगी सरकारमध्ये मंत्री बनवले आहे.

Jitin Prasada
येडियुरप्पांना भाजप नेतृत्वाचा ब्रेक? यावर नवीन मुख्यमंत्री म्हणाले...

दरम्यान, प्रसाद यांना राज्यात मंत्री करण्यात आल्याने भाजपवर टीका होऊ लागली आहे. केंद्रात मंत्री असलेल्या व्यक्तीला राज्यात मंत्री केल्याची टीका होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले आहे. भाजपने जाती पाहून मंत्रिपदे वाटली, अशीही टीका केली जात आहे. सत्तेसाठी केंद्रात मंत्रिपद भूषवलेले राज्यात आले, असेही काही जण म्हणत आहेत.

Jitin Prasada
महाराष्ट्रानंतर आता राजस्थान! मुख्यमंत्र्यांचे बंधू अडकले ईडीच्या फेऱ्यात

भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक, गुजरात व उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलण्यात आले आहेत. काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही बदलण्याची चर्चा सुरू होती. पण पक्षश्रेष्ठीनं पुन्हा एकदा योगी यांच्यावरच विश्वास दाखवत केवळ मंत्रिमंडळ विस्तार कऱण्याचा निर्णय घेतला. आगामी निवडणुका योगींच्याच नेतृत्वाखाली लढण्यात येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com