LPG cylinder price hike in India  Sarkarnama
देश

LPG Cylinder: 19 किलोच्या सिलिंडरला पर्याय; आता 10 किलोचा सिलिंडर येणार? छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा

LPG Cylinder News: १९ किलोच्या जड व्यावसायिक एलपीजी सिलिंडरला पर्याय म्हणून १० किलोचा हलका कंपोझिट सिलिंडर आणण्याची तयारी सुरू आहे. जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि फायदे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: एलपीजी गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. छोटे व्यावसायिक, विद्यार्थी, भाड्याने राहणारे नागरिक आणि स्थलांतरित कामगार यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार १० किलो वजनाचा हलका कंपोझिट एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी याबाबत प्रस्ताव तयार केला असून केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर तो टप्प्याटप्प्याने उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

तीन सरकारी तेल कंपन्यांचा पुढाकार

इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) या सरकारी तेल कंपन्या सध्या १० किलो वजनाचा कंपोझिट एलपीजी सिलिंडर व्यावसायिक ग्राहकांसाठी उपलब्ध करण्याच्या तयारीत आहेत. सध्या व्यावसायिक वापरासाठी १९ किलो, ५ किलो आणि २ किलोचे सिलिंडर उपलब्ध आहेत. मात्र १९ किलोचा सिलिंडर वजनाने जड असल्याने त्याची वाहतूक आणि वापर करताना अनेकांना अडचणी येतात.

छोट्या व्यावसायिकांना होणार सर्वाधिक फायदा

चहाचे स्टॉल, छोटे हॉटेल, कॅफे, फूड स्टॉल, रस्त्यावरील विक्रेते तसेच कमी प्रमाणात गॅस वापरणारे व्यावसायिक अनेक दिवसांपासून हलक्या सिलिंडरची मागणी करत होते. १० किलोचा सिलिंडर उपलब्ध झाल्यास त्यांना जड सिलिंडर उचलण्याचा त्रास कमी होणार आहे.

किंमत किती असू शकते?

१० किलोच्या व्यावसायिक कंपोझिट सिलिंडरची किंमत अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र ती ५ किलो आणि १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

खास वैशिष्ट्ये

हा सिलिंडर उच्च-घनता पॉलीथिलीन (HDPE) आधारित कंपोझिट तंत्रज्ञानाने तयार करण्यात आला आहे. पारंपरिक स्टील सिलिंडरच्या तुलनेत तो जवळपास ५० टक्के हलका आहे. त्यामुळे तो सहज उचलता येतो आणि वाहून नेणेही सोपे होते.

या सिलिंडरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे अर्धपारदर्शक बाह्य आवरण त्यामुळे अतिरिक्त गेजशिवाय सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे सहज दिसते.

कोणाला होणार फायदा?

१० किलोचा सिलिंडर उपलब्ध झाल्यास या ग्राहकांना सर्वाधिक फायदा होणार आहे.

* छोटे हॉटेल, कॅफे आणि चहाचे स्टॉल

* फूड स्टॉल आणि रस्त्यावरील विक्रेते

* भाड्याच्या घरात राहणारे विद्यार्थी

* नोकरीनिमित्त स्थलांतरित झालेले कर्मचारी

* कमी प्रमाणात गॅस वापरणारे छोटे व्यावसायिक

या हलक्या सिलिंडरमुळे वाहतूक, हाताळणी आणि दैनंदिन वापर अधिक सोपा होणार असून, व्यावसायिक ग्राहकांसाठी तो अधिक सोयीचा पर्याय ठरण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT