ADR Report  Sarkarnama
देश

ADR Report : मागील चार वर्षांत 111 खासदार-आमदारांचे पक्षांतर; अहवालातून धक्कादायक माहिती उघड!

111 MP MLA Changed Parties : राज्यांमधील सरकारे पडण्यामागे आणि नवी सरकारे स्थापन होण्यामागे आमदारांचे हे पक्षांतरच मुख्य कारण ठरले. मागील चार वर्षांत तब्बल 111 आमदार-खासदारांनी पक्षांतर केले आहे.

Roshan More

ADR Report News : भारतीय राजकारणात आयाराम-गयारामांची चलती असते. मात्र, एका पक्षाकडून विजयी झाल्यानंतर त्या पक्षाचा त्याग करून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या आमदार खासदारांची संख्या मागील चार वर्षांत लक्षणीय वाढल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

'एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स' आणि 'नॅशनल इलेक्शन वॉच' यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संयुक्त अहवालातून २०२२ ते २०२६ या काळात देशातील १११ विद्यमान खासदार (MP) आणि आमदारांनी (MLAs) आपला मूळ पक्ष सोडून दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश केला आहे.

या कालावधीत झालेल्या सार्वत्रिक निवडणुका, राज्य विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकांच्या आकडेवारीच्या आधारे हे विश्लेषण तयार करण्यात आले आहे. अहवालातील आकडेवारीवरून स्पष्ट होते की, पक्षांतराच्या सर्वाधिक घटना राज्य विधानसभांमध्ये दिसून आल्या.

सभागृह पक्षांतर करणारे लोकप्रतिनीधी

राज्य विधानसभा : ७८ आमदार

लोकसभा : २६ खासदार

राज्यसभा : ७ खासदार

ADR च्या अहवालात विशेषतः नमूद करण्यात आले आहे की, अलीकडच्या वर्षांत अनेक राज्यांमधील सरकारे पडण्यामागे आणि नवी सरकारे स्थापन होण्यामागे आमदारांचे हे पक्षांतरच मुख्य कारण ठरले. आमदारांनी भूमिका बदलल्यामुळे अनेक राज्यांचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून गेले.

नागालँड, पश्चिम बंगाल अव्वल स्थानी

ईशान्य आणि पूर्व भारतातील राज्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या पक्षांतराचे प्रमाण सर्वाधिक आढळले. पक्षांतराच्या बाबतीत नागालँड अव्वल स्थानी आहे. राज्यातील ३२ खासदार आणि आमदारांनी आपला पक्ष बदलला, जे एकूण पक्षांतराच्या २९% आहे. या यादीत पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर असून तेथे २० लोकप्रतिनिधींनी (एकूण १८%) निवडणूक जिंकल्यानंतर आपला मूळ पक्ष सोडला.

कोणत्या राजकीय पक्षांना फटका

पक्षांतराचा सर्वात मोठा फटका तीन प्रमुख राजकीय पक्षांना बसला. नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP), ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) या तिन्ही पक्षांनी मिळून एकूण १११ पैकी ६४ (म्हणजेच ५८%) लोकप्रतिनिधी गमावले.

पक्ष पक्षांतर केलेले लोकप्रतिनिधींची संख्या ( टक्केवारी)

नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी : २५ लोकप्रतिनिधी (२३%)

ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस : २० लोकप्रतिनिधी (१८%)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस : १९ लोकप्रतिनिधी (१७%)

भारत राष्ट्र समिती : ९ लोकप्रतिनिधी (८%)

आम आदमी पार्टी : ७ लोकप्रतिनिधी (६%)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी : ७ लोकप्रतिनिधी (६%)

शिवसेना (ठाकरे गट): ६ लोकप्रतिनिधी (५%)

जनता दल : ५ लोकप्रतिनिधी (५%)

नॅशनल पीपल्स पार्टी : ४ लोकप्रतिनिधी (४%)

कोणत्या पक्षांना फायदा?

पक्षांतर करणाऱ्या बहुतांश नेत्यांना आपल्या गटात खेचण्यात प्रामुख्याने तीन राजकीय पक्ष यशस्वी ठरले. नागा पीपल्स फ्रंट (NPF), भारतीय जनता पार्टी (BJP) आणि नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) यांनी मिळून पक्षांतर करणाऱ्या १११ पैकी ८१ (म्हणजेच ७३%) लोकप्रतिनिधींना आपल्या पक्षात सामील करून घेतले.

पक्ष : सामील झालेले लोकप्रतिनिधी (आमदार-खासदार)

नागा पीपल्स फ्रंट : ३२

भाजप: २९

नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया : २०

काँग्रेस : ९

शिवसेना: ८

नॅशनल पीपल्स पार्टी : ६

पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल: ४

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT