AAP sarkarnama
देश

Punjab:तेरा डॅाक्टर करणार जनसेवा ; 'आप'ने रचला नवा इतिहास

'आप'ने पंजाबमधील आपल्या मंत्रीमंडळाची यादी प्रसिद्ध केली आहे. कोणाला कोणते खाते मिळाली यांची माहिती त्यात देण्यात आली आहे.

सरकारनामा ब्युरो

अमृतसर : पंजाब विधानसभा निवडणुकीत आम (AAP)आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला. आम आदमी पक्षाने तब्बल 92 जागांवर विजय मिळवून ऐतिहासिक नोंद केली आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेले हे ९२ आमदार आहेत.

''पंजाबमध्ये पहिल्यांदा १३ डॅाक्टर हे आमदार झाले आहेत,'' असे आपचे नेता सत्येंद्र जैन (Satyendra Jain)यांनी टि्वट केले आहे. 'आप'ने पंजाबमधील आपल्या मंत्रीमंडळाची यादी प्रसिद्ध केली आहे. कोणाला कोणते खाते मिळाली यांची माहिती त्यात देण्यात आली आहे.

''भारतीय राजकारणात एक नवा इतिहास रचला आहे. पंजाबमध्ये १३ डॅाक्टर हे आम आदमी पक्षाचे आमदार झाले आहेत, डॅाक्टर आता लोकप्रतिनिधी झाले आहेत,'' असे जैन यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. जैन यांनी या तेरा डॅाक्टर आमदारांची यादी प्रसिद्ध केली आहे.

aam aadmi party

बंगा येथील सुखविंदर कुमार सुखी, चब्बेवाल येथून राजकुमार चब्बेवाल, तरनतारन येथून कश्मीर सिंह सोहल, शाम कहुरासी येथून रवजोत सिंह, चमकौर साहिब येथून चरणजीत सिंह, नवांशहर येथील नछत्तर पाल, अमृतसर दक्षिण येथील इंदरबीर निज्जर आदी डॅाक्टर 'आप'चे आमदार झाले आहेत.

पंजाबमध्ये खासदार भगवंत मान (Bhagwant Mann) यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आधीच घोषित करत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांच्या या खेळीला फायदा पक्षाला झाला असून पंजाबमधील 117 विधानसभा जागांपैकी 92 जागांवर आपचे उमेदवार विजयी झाले आहे. या विजयानंतर मान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे पाय धरले आणि त्यांचे आभार मानले. तसेच शपथविधी सोहळ्याला येण्याचे निमंत्रणही दिले आहे.

या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामध्ये पुर्व मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग, मुख्यमंत्री चन्नी, आणि कॅाग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचा समावेश आहे. पंजाबमध्ये सत्तेत असणाऱ्या कॅाग्रेसला 77 जागांवरून केवळ 18 जागा मिळविल्या आहेत. अकाली दल आघाडीला चार व आक्रमकपणे निवडणुक लढवलेल्या भाजपला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT