सिद्धू अन् मजिठियांना धुळ चारणाऱ्या 'आप'च्या ''पॅडवूमन'' बाबत जाणून घ्या!

मजिठीया आणि सिद्धु प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यग्र होते. तेव्हा जीवनज्योत कौर यांनी घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधत होत्या.
Jeevan Jyot Kaur News | Padwoman of Punjab News | Punjab election result 2022 News
Jeevan Jyot Kaur News | Padwoman of Punjab News | Punjab election result 2022 Newssarkarnama
Published on
Updated on

अमृतसर : आम आदमी पार्टी पंजाबमध्ये (AAP)सत्ता स्थापन करणार आहे. या निवडणुकीत अमृतसर पूर्व (Amritsar East)मधून निवडून आलेल्या आपच्या जीवन ज्योत कौर (Jeevan Jyot Kaur) सध्या चर्चेत आहेत. (Punjab election result 2022 News)

त्यांनी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू (Bikram Singh Majithia)आणि शिरोमणि अकाली दलाचे नेता व्रिकम सिंह मजिठिया (Bikram Singh Majithia)यांचा सहा हजारांपेक्षा अधिक मतांना पराभव केला आहे. कोण आहेत जीवन ज्योत कौर याविषयी जाणून घेऊया

जीवन ज्योत कैार यांनी नवज्योत सिंह सिद्धू यांचा ३१, ८३८, तर बिक्रम सिंह मजिठिया यांना २४, २८९ मतांना पराभव केला आहे. तर भाजपचे उमेदवार जगमोहन सिंह राजू यांना ७, २०३ मते मिळाली आहेत. तर जीवन ज्योत कैार यांना ३४, ४१७ मते मिळाली आहेत.

Jeevan Jyot Kaur News | Padwoman of Punjab News | Punjab election result 2022 News
UP Election:शिवसेनेचा पहिला मंत्री होणार ; राऊतांच्या भविष्यवाणीचं काय झालं?

एकीकडे मजिठीया आणि सिद्धु प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यग्र होते. तेव्हा जीवनज्योत कौर यांनी घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधत होत्या. अमृतसरमध्ये पिण्यासाठी शुद्ध पाणी, उघडी गटारं, रहिवासी वस्त्यांमध्ये उघड्यावर पडलेल्या विजेच्या तारा, मुलांमध्ये असलेली ड्रग्जची सवय असे अनेक मुद्दे ऐरणीवर आहेत.

जीवनज्योत या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. ''पंजाबच्या पॅडवूमन'' म्हणून त्यांची पंजाबमध्ये ओळख आहे. प्लॅास्टिक सँनिटरी पॅडच्या वापरामुळे आरोग्यावर होणारे वाईट परिणाम याबाबत त्या जनजागृती करीत आहेत. त्यांनी एका स्वीस कंपनीशी करार केला आहे. ही कंपनी ग्रामीण भागातील महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करते. त्या हेमकुंट एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक आहेत.

Jeevan Jyot Kaur News | Padwoman of Punjab News | Punjab election result 2022 News
EDचे माजी अधिकारी राजेश्वर सिंह यांचा ५५ हजारांनी दणदणीत विजय

हेमकुंट एज्युकेशन सोसायटी ही वंचित समाजासाठी काम करते. आरोग्य, शिक्षण, झोपडपट्टी पूनर्वसन, महिला उद्योजक, महिला सक्षमीकरण आदी विषयांवर त्या कार्यरत आहेत. सुरवातीपासून त्या आम आदमी पक्षाचे काम करीत होत्या. त्यानंतर पक्षाच्या प्रवक्तेपदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. आप आदमी पक्षाच्या महिला विभागाच्या त्या प्रमुख आहेत. त्यांनी चौधरी चरण सिंह यूनिवर्सिटीमधून कायद्याची पदवी घेतली आहे. जीवनज्योत यांना दोन मुलं असून एक वकील असून दुसरा मुलगा डेन्टीस्ट आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com