Russia Ukraine War sarkarnama
देश

Russia-Ukraine War:पहिल्या दिवशी युद्धात १३७ जणांचा मृत्यू ; ७० लष्करी तळ उद्ध्वस्त

राजधानी कीवमधील राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे राष्ट्रपती जेलेंस्की यांनी व्हिडोओच्या माध्यमातून सांगितले आहे.

सरकारनामा ब्युरो

कीव (युक्रेन) : रशिया आणि युक्रेनमधील वाद मिटण्याऐवजी टोकाला गेल्याने त्याचे परिणाम युद्धात दिसत आहे. रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले. (Russia Ukraine War) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आणि युक्रेनमधील शहरांवर हल्ले सुरु झाले. युक्रेनने रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे म्हटले आहे.

रशियाच्या हल्ल्यात पहिल्या दिवशी १३७ जणांचा मृत्यू झाला आहे, युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की (President Volodymyr Zelensky) यांनी ही माहिती दिली आहे. रशिया आणि युक्रेनच्या वादात इतर देश हस्तक्षेप करत नसून युक्रेन रशियासोबत एकटे लढत आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अधिक भडकलं आहे. गुरुवारी रशियाने युक्रेनवर संपूर्ण सैन्य दलासह हल्ला केला. राजधानी कीवमधील राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे राष्ट्रपती जेलेंस्की यांनी व्हिडोओच्या माध्यमातून सांगितले आहे. ते म्हणाले,‘रशियाने राजधानी कीवमध्ये प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत शहरातील नागरिकांना सतर्क राहा आणि कर्फ्यूचे पालन करा.’जेलेन्स्की यांनी नाटो देशांवर सडकून टीका केली आहे.

वलोडिमिर जेलेंस्की म्हणाले, ''रशियासोबत लढण्यासाठी युक्रेनला एकटे सोडले गेले आहे. आमच्यासोबत लढण्यासाठी कोण उभे आहे? मला काही दिसत नाही. युक्रेनला नाटो सदस्यत्वाची हमी देण्यासाठी कोण तयार आहे? प्रत्येक जण घाबरत आहे. आम्ही आमच्या १३७ हिरोसह नागरिकांना गमावले आहे. तर ३१६ जण जखमी झाले आहेत,"

‘हल्ल्यात पहिल्या दिवशी युक्रेनमधील ७० हून अधिक लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत.’असा दावा रशियाने केला आहे. पुतीन म्हणाले की, ‘जर रशियाच्या कारवाईत कोणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर यापूर्वी कधीही न पाहिलेले परिणाम होतील.’ पुतीन यांनी थेट नाटो आणि अमेरिकेला इशारा दिला आहे.

युक्रेनने या युद्धामध्ये मध्यस्थी करण्याची मागणी भारताकडे केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली. यावेळी रशियाला चर्चेतून वाद मिटवा हिंसेचा मार्ग सोडा, असे मोदी पुतीन यांना म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT