New Delhi : मै नरेंद्र दामोदरदास मोदी..! पंतप्रधान मोदींनी सोमवारी लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांच्यापाठोपाठ इतर मंत्री व नव्याने निवडून आलेल्या खासदारही आज शपथ घेत आहेत. 18 व्या लोकसभेचे हे पहिले अधिवेशन असून मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे.
लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मीडियाशी बोलताना १८ अंकाचे महत्व सांगितले. 18 वी लोकसभा खूप शुभ असल्याचे सांगत मोदी म्हणाले, देशात १८ अंकाचे सात्विक महत्व आहे.
गीतेमध्ये 18 अध्याय आहेत. पुराण आणि उपपुराणांची संख्याही 18 आहे. 18 चा मूलांक 9 आहे आणि 9 पूर्णतेची गॅरंटी देतो 9 हा अंक पूर्णतेचे प्रतिक आहे. आपल्याकडे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार मिळतो, असे महत्व मोदींनी सांगितले.
मोदींनी विरोधकांनाही सभागृहाचे कामकाज योग्यपध्दतीने चालविण्याचा सल्ला दिला. लोकशाहीची प्रतिष्ठा विरोधक जपतील, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. पण दुसरीकडे काही मिनिटांतच विरोधकांनी सरकारला अपशकून केला.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी संसदेच्या आवारात आणि सभागृहातही जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभेमध्ये पंतप्रधान मोदी सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी उठताच इंडिया आघाडीच्या सदस्यांनी हातात संविधानाची प्रती घेत उभे राहून घोषणा दिल्या. तसेच संसदेच्या आवारातही विरोधकांनी एकत्रित येत हातात संविधान घेऊन घोषणाबाजी केली.
एकीकडे मोदींनी 18 अंकाचे सांगितलेले शुभ संकेत आणि विरोधकांना दिलेला सल्ला तर दुसरीकडे विरोधकांकडून संविधानाच्या प्रती हातात घेऊन सरकारला दिलेला अप्रत्यक्ष इशारा खूप काही सांगून जातो. त्यामुळे अधिवेशनात सरकार विरुध्द विरोधक असा सामना रंगणार, हे पहिल्याच दिवशी स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.