Prashant Kishor : नितीश कुमारांनी 'मोदी 3.0' मध्ये मोठं मंत्रालय का मागितलं नाही? प्रशांत किशोरांनी सांगितलं खळबळजनक कारण

Prashant Kishor News : जे लोक सक्रियपणे जनतेसाठी काम करतात त्यांनीच पदावर रहावं. कारण...; असंही प्रशांत किशोर यांनी सांगितलं.
prashant kishor nitish kumar narendra modi
prashant kishor nitish kumar narendra modisarkarnama

मोदी सरकार 3.0 मध्ये बिहारला कोणतंही मोठं मंत्रालय मिळालं नाही. त्यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापलं आहे. माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव ( tejashwi yadav ) यांनी 'खुळखुळा' मिळाल्याचं म्हणत मुख्यमंत्री नितीश कुमार यांची खिल्ली उडवली आहे.

त्यातच आता जनसुराज पक्षाचे सर्वेसर्वा आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर ( Prashant Kishor ) यांनी मोठं विधान केलं आहे. नितीश कुमार यांनी मोठं मंत्रालय का घेतलं नाही? याचं धक्कादायक कारणच किशोर यांनी सांगितलं आहे.

बिहारमधील अनेक नेत्यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. पण, मोदी 3.0 सरकारमध्ये एकाही मंत्र्याला महत्वाचं खाते मिळालं नसल्याचं बिहारमधील राजकारणात टीका-टिप्पणीनं जोर धरला आहे.

एका इंग्रजी माध्यमाशी संवाद साधताना प्रशांत किशोर म्हणाले, "नितीश कुमार यांना ( Nitish Kumar ) तुम्ही जेवढं ओळखत नाही, तेवढं मी ओळखतो. नितीश कुमार यांना भीती वाटतेय की, जर त्यांनी महत्वाचं मंत्रालय दुसऱ्याला दिलं तर ते त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊ शकतात. त्यामुळे नितीश कुमार यांनी अशा मंत्रालयाची निवड केली, जिथे ते वाद किंवा अंतर्गत विरोधाचा सामना न करता काम करू शकतील."

prashant kishor nitish kumar narendra modi
Prashant Kishor : यावेळी लिहून देतो बिहारमध्ये कोणाची सत्ता, प्रशांत किशोरांनी दिले चॅलेंज

"जे लोक सक्रियपणे जनतेसाठी काम करतात त्यांनीच पदावर रहावं. कारण, अकार्यक्षम नेत्यांना घटनात्मक मार्गानं हटवण्याचा अधिकार नागरिकांना आहे. मतदारांनी विकासाशी संबंधित मुद्द्यांना प्राधान्य द्यावं," असं आवाहन प्रशांत किशोर यांनी केलं आहे.

prashant kishor nitish kumar narendra modi
Prashant Kishor : भाजपचं मोठं नुकसान कशामुळे झालं? प्रशांत किशोर यांनी सांगितलं 'कारण'

दरम्यान, यापूर्वी आरसीपी सिंह यांना केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पक्षात फोडाफोडी केल्याचा आरोप करण्यात आला होता. नंतर आरसीपी सिंह यांनी भाजपत प्रवेश केला. आरसीपी सिंह यांना पोलाद ( स्टील ) मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com