Pandurang Madkaikar Sarkarnama
देश

Pandurang Madkaikar : 20 लाखांच्या लाच प्रकरणी 'या' माजी मंत्र्याची चौकशी होणार, ACB कडून हालचाली सुरू

Former Minister Pandurang Madkaikar Bribery Goa : एका सत्ताधारी मंत्र्याला छोट्याशा कामासाठी 15 ते 20 लाख रुपये दिल्याचा सनसनाटी आरोप कुंभारजुवेचे माजी आमदार तथा माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केला होता. त्याच्या चौकशीची मागणी करणारी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) दाखल झाली आहे.

Pramod Sawant

Panaji News, 12 Feb : एका सत्ताधारी मंत्र्याला छोट्याशा कामासाठी 15 ते 20 लाख रुपये दिल्याचा सनसनाटी आरोप कुंभारजुवेचे माजी आमदार तथा माजी मंत्री पांडुरंग मडकईकर (Pandurang Madkaikar) यांनी केला होता. त्याच्या चौकशीची मागणी करणारी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) दाखल झाली आहे.

याप्रकरणी प्राथमिक चौकशीसाठी पांडुरंग मडकईकर यांना लवकरच कार्यालयात बोलावण्यात येणार असल्याची माहिती ‘एसीबी’च्या सूत्रांनी दिली आहे. मडकईकर यांनी केलेला आरोप गंभीर स्वरूपाचा आहे. मात्र, त्यांनी ही लाच कोणाला दिली, हे उघड केलेले नाही. त्यामुळे त्यांची याप्रकरणी जबानी नोंदवून माहिती मिळविणे आवश्‍यक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘एसीबी’कडे आलेली तक्रारीची फाईल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निर्णय घेण्यासाठी पाठवण्यात आली होती. या प्रकरणी केलेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी मडकईकर यांना चौकशीसाठी बोलवावे, असा शेरा मारून तो चौकशी अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी नोटीस पाठवून ‘एसीबी’च्या कार्यालयात बोलावण्यात येईल.

काशिनाथ शेट्ये आणि इतरांनी माजी आमदार मडकईकर यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करून ही लाच कोणाला देण्यात आली, त्याचा तपास करून कारवाई करावी. त्यांनी केलेले आरोप गंभीर असून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनीही राज्यपालांना निवेदन देऊन या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली आहे. त्यांच्या या आरोपामुळे विरोधकांकडून चौकशीची मागणी होत असतानाच सरकार तसेच भाजपकडून असे काही घडलेलेच नाही, असा पवित्रा घेऊन कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

...तर मडकईकरही जबाबदार

मडकईकरांनी दिलेली ही रोख रक्कम ते दरवर्षी आयकर खात्याला सादर करत असलेल्या हिशोबातील आहे का? याची माहिती मिळवावी लागेल. लाच घेणे तसेच ती देणे, हा गुन्हा आहे. मडकईकर यांनी जर स्वतःचे काम करवून घेण्यासाठी ही रोख रक्कम दिली असेल, तर तेसुद्धा जबाबदार आहेत. त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले जाईल, अशी माहिती ‘एसीबी’च्या सूत्रांनी दिली.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT