Ajit Pawar : अजितदादांनी टाकला मोठा डाव; पक्षांतर्गत वाद वाढू नयेत धनंजय मुंडेंच्या रिक्त मंत्रिपदाबाबत घेतला 'हा' निर्णय!

Dhananjay Munde minister post News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भविष्यात पक्षांतर्गत वाद वाढू नयेत, यासाठी मोठा डाव टाकला आहे. त्यांनी 'या' रिक्त खात्याच्या मंत्रिपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचे नाव आले होते. त्यामुळे विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोपामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातच धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला असल्याने महायुती सरकार बॅकफुटावर गेले असल्याची चर्चा रंगली होती. त्यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला देखील मोठा झटका बसला असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भविष्यात पक्षांतर्गत वाद वाढू नयेत, यासाठी मोठा डाव टाकला आहे. त्यांनी 'या' रिक्त खात्याच्या मंत्रिपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) त्यांच्या पक्षातील सहकारी धनंजय मुंडें यांच्याकडे असलेलया मंत्रिपदाबाबत निर्णय घेतले असल्याचे पुढे आले आहे. त्यानुसार रिक्त असलेले अन्न-नागरी पुरवठा मंत्रालय स्वत:कडेच ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे येत्या काळात मंत्रीमंडळात अन्य नव्या सहकाऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हे खाते स्वतःकडेच अजितदादा ठेवणार आहेत.

Ajit Pawar
BJP : तगडे संख्याबळ असूनही भाजपची अत्यंत सावध पावलं; तीन आमदारांसाठी 'सिक्रेट स्ट्रॅटेजी'

येत्या काळात अजितदादा अन्न-नागरी पुरवठा मंत्रालय स्वत:कडेच ठेवणार असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षांतर्गत वाद वाढू नयेत, यासाठी ही खेळी असल्याचे म्हटलं जात आहे. धनंजय मुंडे यांनी बीड प्रकरणावरुन मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ही रिक्त जागा त्वरित भरली जाईल, असा काही इच्छुकांनी कयास लावला होता. त्यानुसार प्रयत्न सुरु केले होते.

Ajit Pawar
Shivsena UBT : चिपळूण झालं आता वैभववाडीत ठाकरे शिवसेनेला खिंडार; युवा सेना चिटणीसनेच सोडली पक्षाची साथ

अन्न-नागरी पुरवठा मंत्रालय अजित पवार स्वत:कडेच ठेवणार असल्याने या पक्षातील अन्य इच्छुक मंत्र्यांकडे पदभार स्वीकारण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येत्या काळात या खात्यासाठी इच्छुक असलेल्या मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Ajit Pawar
NCP Mlc News : जागा 1 इच्छुक शंभर, त्यात पुण्याचे 2 मेंबर; कोणाचा लागणार नंबर ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com