Reserve Bank of India : दोन हजार रुपयांच्या 97.92 टक्के नोटा बँकिंग प्रणालीत परतल्या आहेत. तर अद्यापही 7,409 कोटी रुपयांच्या नोटा जनतेमध्येच आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी सांगितले की, 2000 रुपयांच्या 97.92 टक्के नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या आहेत आणि परत घेण्यात आलेल्या नोटांमधून केवळ 7,409 कोटी रुपये जनतेकडे उरले आहेत.
19 मे 2023 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने(RBI) 2000 रुपये मूल्यवर्गाच्या नोटांना चलनातून परत घेण्याची घोषणा केली होती. त्यादिवशी चलनात असलेल्या नोटांचे एकूण मूल्य दिवसभराचा कारभार संपला तेव्हा 3.56 लाख कोटी रुपये होतं. आरबीआय नुसार 31 जुलै, 2024 रोजी कारभार बंद झाल्यावर हे घटून 7,409 रुपये झाले.
आरबीआयने गुरुवारी जारी केलेल्या विधानात म्हटले आहे की, 19 मे 2023 पर्यंत चलनात 2000 रुपयांच्या 97.92 टक्के नोटा परत आल्या आहेत.
2000 रुपयांच्या बँकनोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची सुविधा 7 ऑक्टोबर, 2023 पर्यंत देशभरातील सर्व बँकांमध्ये उपलब्ध होती. आता 2000 रुपयांच्या बँकनोटा बदलण्याची सुविधा 19 मे, 2023 पासून आरबीआयच्या 19 कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे.
9 ऑक्टोबर, 2023 पासून आरबीआय इशू कार्यालय सुद्धा व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यासाठी 2000 रुपयांच्या बँकनोटा स्वीकारत आहे. याशिवाय सामान्य नागरिक देशातील कोणत्याही टपाल कार्यालयामधून इंडिया पोस्टच्या माध्यमातून 2000 रुपयांच्या बँक नोटा आपल्या खात्यात जमा करण्यासाठी आरबीआयच्या कोणत्याही कार्यालयात पाठवू शकतात.
या नोटांना जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी 19 आरबीआय कार्यालयांमध्ये अहमदाबाद, बंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगढ, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम या ठिकाणांचा समावेश आहे.
(Edited - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.