Harayana vidhansabha Election 2024 : सध्या हरियाणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उमेदवार निश्चित करण्याची कसरतही सुरू झाली आहे, त्यासाठी सर्वच पक्षांच्या बैठका सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पण उत्सुकता लागली आहे ती 8 ऑक्टोबरला निकाल लागण्यानंतर कोण जिंकलं? आणि कोण हरलं पण तरीही जिंकले हे बघण्याची.
निवडणुकीत अशा अनेक जागा आहेत जिथे उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकतात आणि हारतात 2019 मध्ये सर्वात लहान आणि मोठ्या फरकाने जिंकलेल्या आणि हरलेल्या जागांबद्दल जाणून घेऊया.
गेल्या 2019 विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election ) 90 पैकी भाजपला सर्वाधिक 40 जागा मिळाल्या होत्या. 31 जागा जिंकून काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष ठरला. विधानसभा निवडणुकीत 'जेजेपीला' 10 जागा जिंकण्यात यश आले. तर सात अपक्षला आणि 'इंडियन नॅशनल लोक दल'ला (INLD) एक जागा आणि 'हरियाणा लोकहित पक्षा'ने एक जागा जिंकली. सत्ताधारी भाजप बहुमताच्या आकड्यापासून मात्र दूर होता.
90 सदस्यीय विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 46 जागांवर विजय आवश्यक होता. त्यामुळे निवडणुकीनंतर, पक्षाने 10 जागां मिळवलेल्या 'जेजेपीला' सोबत युती केली आणि राज्यात सत्ता स्थापन केली. 27 ऑक्टोबर 2019 ला मनोहर लाल यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर किंग मेकर बनलेल्या दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
गेल्या विधानसभा निवडणुकीत 1000 पेक्षा कमी फरकाने तीन जागा होत्या. या जागा सिरसा, पुन्हाणा आणि ठाणेसर या गावातील होत्या. भाजप, काँग्रेस (Congress) आणि हरियाणा 'लोक हित पार्टी'ने प्रत्येकी एक जागा गमावली होती. अशा सात जागांवर 1000 ते 2000 मतांच्या फरकाने उमेदवारांना विजय मिळाला. त्यापैकी चार जागांवर काँग्रेसचे उमेदवार तर तीन जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.