New Delhi News : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली.इंडिया आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ ठरला. या निवडणुकीतील यशामुळे संसदेत विरोधकांचा आवाज वाढला तसेच खासदार राहुल गांधींचंही जोरदार कमबॅक केलं.
विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर ते सत्ताधारी एनडीए सरकारला अधिकच आक्रमक झाले आहेत.याच राहुल गांधींविषयी (Rahul Gandhi) राज्यसभेवर निवडून गेलेल्या एका नेत्यानं मोठं विधान केलं आहे.
काँग्रेसने अभिषेक मनू सिंघवी यांना तेलंगणामधून राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांची खासदारपदी बिनविरोध निवड झाली आहे.ते काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सदस्यही आहेत.सिंघवी यांनी राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाविषयी मोठा दावा केला आहे.
अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, राहुल गांधी हे ज्या गोष्टी बोलतात आणि करतात त्यात अजिबातच फरक दिसून येत नाही.ज्या लोकांकडून राहुल गांधी यांची टिंगलटवाळी केली जात होती. त्यांना आता धक्का बसला आहे. कुठल्याही गोष्टीबाबत राहुल हे दुहेरी भूमिका घेत नाहीत,ते मुद्यांवरच फोकस करुन ते प्रभावीपणे मांडतात असे कौतुकाचे बोलही सिंघवी यांनी काढले.
काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांचं गांभीर्य आता प्रत्येक घटकाला समजू लागलं आहे. लोकांमध्ये राहुल जे बोलतात ते करुन दाखवतात असा विश्वास निर्माण झाला आहे.अनेक मुद्यांवर त्यांचं काम सुरू आहे, आणि त्यात ते पूर्णपणे झोकून देतात.
ते गांभीर्य आणि सन्मान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. काँग्रेस ज्यावेळी सत्तेत येईल तेव्हा ते राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे 100 टक्के प्रबळ दावेदार असणार हा दावा सिंघवी यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत कमबॅक केलेल्या काँग्रेसने कोणत्या उमेदवारासाठी किती पैसे खर्च केले याची माहिती समोर आली आहे. पक्षाचे नेते राहुल गांधींनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यासाठी पक्षाने 1 कोटी 40 लाख म्हणजे प्रत्येक मतदारसंघात 70 लाख रुपये खर्च केले. पण पक्षाने एका उमेदवारावर राहुल यांच्यापेक्षा जास्त खर्च केला आहे.
राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वानयाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत दणदणीत विजयही मिळवला आहे. प्रामुख्याने रायबरेलीमध्ये त्यांचा कस लागणार होता. त्यामुळे पक्षाची मोठी टीम या मतदारसंघात कार्यरत होती. परंतू, दोन्ही मतदारसंघात मिळून 1 कोटी 40 लाख रुपये खर्च झाल्याचे काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.