Sanjeevani Yojana 2024 : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. केजरीवालांनी दिल्लीतील ज्येष्ठांना मोठ गिफ्ट दिलं आहे.
अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील 60 वर्षांवरील वृद्धांवर मोफत उपचार केले केले जाणार आहेत. याअंतर्गत वृद्धांसाठी 'संजीवनी योजना' सुरू करण्याची घोषणा केली.
"दिल्लीतील आमच्या सर्व वृद्धांसाठी केजरीवाल सरकारकडून ही हमी आहे. आज मी ज्येष्ठ नागरिकांसाठी संजीवनी योजना जाहीर करत आहे. यामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे", असे केजरीवाल म्हणाले.
यावेळी बोलतांना केजरीवाल म्हणाले की, '60 वर्षांवरील वृद्धांना दिल्लीत मोफत उपचार मिळणार आहेत. उपचाराचा संपूर्ण खर्च दिल्ली सरकार उचलणार आहे. ही केजरीवालांची (Arvind Kejriwal) हमी आहे. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नोंदणी करतील.'
सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात मोफत उपचार केले जातील. कोणतीही वरची मर्यादा असणार नाही. एपीएल, बीपीएल कार्ड आवश्यक नाही. त्याची नोंदणी दोन-तीन दिवसांत सुरू होईल. आमचे कार्यकर्ते तुमच्या घरी येतील, तुम्हाला कार्ड देतील, ते सुरक्षित ठेवा. निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाचे (AAP) सरकार आले तर ते आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करेल.
संजीवनी योजनेची नोंदणी प्रक्रिया दोन-तीन दिवसांत सुरू होईल.
योजनेचा एक भाग म्हणून, AAP स्वयंसेवक योजनेसाठी पात्र वृद्धांची नोंदणी करण्यासाठी घरोघरी जातील.
दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आप सरकार लवकरच ही योजना लागू करेल.
संजीवनी योजनेंतर्गत दिल्लीत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना मोफत वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
उपचारादरम्यान खर्चाची मर्यादा असणार नाही.
दिल्लीतील सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयात मोफत उपचार उपलब्ध असतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.