cabinet decisions modi Government Sarkarnama
देश

Cabinet Decision : मोठी बातमी: 'सेवा तीर्थ'च्या पहिल्याच बैठकीत रेल्वेच्या 3 मेगा प्रकल्पांना ग्रीन सिग्नल! 12,236 कोटींचा निधी मंजूर, महाराष्ट्राच्या वाट्याला काय?

Union Cabinet approves 3 mega railway projects : सेवा तीर्थच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये 12,236 कोटींच्या 3 मोठ्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी. महाराष्ट्रातील कोणता मार्ग या यादीत आहे ते जाणून घ्या.

Rashmi Mane

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने रेल्वेच्या तीन महत्त्वाच्या मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना हिरवा कंदील दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नव्या पीएमओ इमारतीत ‘सेवा तीर्थ’ येथे झालेल्या पहिल्याच केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत एकूण 12,236 कोटी रुपयांच्या विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मंजूर करण्यात आलेल्या रेल्वे प्रकल्पांमध्ये जबलपूर ते गोंदिया या मार्गाचे दुहेरीकरण, पुनरख ते किऊल या दरम्यान तिसरी आणि चौथी लाईन टाकणे तसेच गमारिया ते चांडेल या मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन उभारणे यांचा समावेश आहे. या तीन प्रकल्पांवर सुमारे 9,072 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामांमुळे रेल्वे मार्गांची क्षमता वाढणार असून प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल. मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक दोन्हींसाठी या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

याच बैठकीत श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिव्हिल एन्क्लेव्ह विकसित करण्यासही मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पासाठी सुमारे 1,677 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अहमदाबादमधील GIFT सिटी ते शाहपूर मेट्रो विस्तारालाही मान्यता देण्यात आली आहे, ज्यामुळे शहरी वाहतूक व्यवस्थेला चालना मिळणार आहे.

शेती क्षेत्रालाही या बैठकीत दिलासा देण्यात आला. 2026-27 हंगामासाठी जूटच्या किमान आधारभूत किमतीत 275 रुपयांची वाढ करून ती 5,925 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. यामुळे जूट उत्पादक शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.

ऊर्जा क्षेत्रातही महत्त्वाचा निर्णय घेत पावरग्रिडच्या इक्विटी गुंतवणूक मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. प्रति उपकंपनी ही मर्यादा 5,000 कोटी रुपयांवरून 7,500 कोटी रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे ऊर्जा पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे. नव्या पीएमओ इमारती ‘सेवा तीर्थ’ येथे झालेल्या या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत देशातील 140 कोटी नागरिकांच्या हिताचा विचार करून निर्णय घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT