Kerala Now Keralam : मोठी बातमी :'केरळ' नाही, आता म्हणा ‘केरळम’, निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचा निर्णय

मोदी सरकार दक्षिणेतील एका राज्याचं नाव बदलण्याची घोषणा निवडणुकीपूर्वी करू शकते. नव्या नावाला मंजुरी.
kerala name change
kerala name changeSarkarnama
Published on
Updated on

मोठी राजकीय घडामोड समोर येत असून केंद्र सरकार दक्षिण भारतातील एका महत्त्वाच्या राज्याच्या नावात बदल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.पंतप्रधान कार्यालय सेवा तीर्थवरून मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मंजुरी मिळाली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केरळचे अधिकृत नाव बदलून ‘केरळम’ करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. त्यामुळे या मुद्द्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. आता केरळ चे नाव बदलून केरलम् ठेवण्यात आले आहे.

आज सेवा तीर्थ येथे सुरू झालेल्या पहिलीच कॅबिनेट बैठक असल्याने अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. त्यात केरळच्या नावबदलाचा प्रस्तावही प्रोसेसमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रिमंडळाने राज्य सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

kerala name change
PCMC Standing Committee : पिंपरी-चिंचवडच्या तिजोरीसाठी 'शंकर जगतापांनी' लावला जोर : स्थायीच्या अध्यक्षपदावर 2 नावांची चर्चा, कुणाच्या गळ्यात पडणार मानाची माळ?

दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे. दक्षिण भारतातील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. केंद्र सरकारने अंतिम निर्णय घेतला आहे त्यामुळे लवकरच अधिकृत घोषणा झाली आहे.

या मागणीमागे राज्यातील राजकीय घडामोडीही कारणीभूत आहेत. केरळमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्याचे अधिकृत नाव ‘केरळ’ ऐवजी ‘केरळम’ करण्याची विनंती केली होती. त्यांच्या मते, ‘केरळम’ हे नाव मल्याळम भाषेशी आणि राज्याच्या सांस्कृतिक ओळखीशी अधिक जवळीक साधणारे आहे. राज्याची परंपरा, इतिहास आणि सांस्कृतिक वारसा लक्षात घेता हे नाव अधिक योग्य असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते.

kerala name change
Imtiaz Jaleel : लव्ह जिहाद विधेयकावरून इम्तियाज जलील यांचा सरकारला थेट सवाल! म्हणाले 'कायदा केला तरी...'

यापूर्वी जून 2024 मध्ये केरळ विधानसभेतही या संदर्भात ठराव मंजूर करण्यात आला होता. सर्वानुमते पारित झालेल्या या ठरावात अधिकृत कागदपत्रांमध्ये ‘केरळ’ऐवजी ‘केरळम’ असा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com