Lok Sabha Security Breach sarkarnama
देश

Lok Sabha Security Breach: संसदेत घुसखोरी करणाऱ्यांची मुंबईत खरेदी

सरकारनामा ब्यूरो

New Delhi : लोकसभेत घुसखोरी करुन स्मोक कँडल फोडणाऱ्या दोघांना तर, संसदेच्या परिसरात घोषणाबाजी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. या चारही जणांना गुरुवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. संसदेत घुसखोर करण्याचा या चारही जणांचा सुनियोजित कट असल्याचा दावा पोलिसांनी केला. न्यायालयाने या चारही जणांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. घुसखोरांनी मुंबईतून स्मोक कँडल तर बूट लखनऊमधून खरेदी केल्याचे न्यायालयाला पोलिसांनी सांगितले.

संसदेत घुसखोरी करणाऱ्या नीलम कौर, अमोल शिंदे, सागर शर्मा, मनोरंजन यांना विशेष एनआईए न्यायालयात न्यायाधीश हरपीत कौर यांच्या समोर हजर करण्यात आले. विविध कलमाअंतर्गत तसेच दहशदवादी विरोधी कायदा युएपीए अंतर्गत नीलम, अमोल, सागर, मनोरंजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी न्यायलयात सांगितले, संसदेवर हल्ला करण्याचा सुनियोजित कट होता. घुसखोर अनेक दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी सोशल मिडियावर एक ग्रुप बनवून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी मुंबईतून स्मोक कँडल खरेदी केले तर, लखनऊमधून बूट खरेदी केले. चार ही जणांवर सरकारी वकिलांनी आतंकवादाचा आरोप केला.

सागर शर्मा आणि मनोरंजन यांनी लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून खासदारांच्या बाकांवर उडी मारली. दोघेही खासदारांच्या बाकांवर उडी मारत लोकसभा अध्यक्षांचा आसनाकडे जात होते. त्यांनी स्मोक कँडल देखील फोडले त्यामुळे लोकसभेत धूर झाला होता. तर, अमोल शिंदे आणि नीलम यांनी संसदेच्या आवारात रंगीत फटाके फोडून घोषणाबाजी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हे चारही जण वेगवेगळ्या राज्यातील आहेत. संसदेत घुसखोरी करण्याच्या आदल्या दिवशी रात्री ते गुरुग्राममध्ये थांबले होते. तिथेच हे चार जण आणि आणखी दोघांची बैठक. फरार आरोपी विक्रमच्या घरीच हे सहा जण थांबले होते. तिथेच या सहा जणांनी सर्व कट रचला, असल्याचे सांगितले जात आहे.

(Edited by Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT