Lok Sabha Security Breach: संसदेत घुसखोरी: सहा जणांनी गुरुग्राममध्ये कट रचला..मास्टरमाईंड कोण?

Parliament Security Breach : अमोल, सागर, विक्रम, ललित, मनोरंजन, नीलम अशी सहा जणांची नावे समोर आली आहेत.
Parliament Security Breach
Parliament Security BreachSarkarnama
Published on
Updated on

Parliament Winter Session 2023 : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना काल (बुधवारी) लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून दोन जणांनी सभागृहात उडी मारली. या दोघांनी घुसखोरी करत स्मोक कॅंडल फेकले. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर बुधवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुन्हा दाखल केला आहै. त्यांना आज (गुरुवारी) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हे चारही जण वेगवेगळ्या राज्यातील आहेत. संसद सुरक्षा भंग प्रकरणात सहा जण सामील होते, अशी माहिती समोर आली आहे. हे सहा जण गुरुग्राममध्ये रात्री थांबले होते. तिथे या सहा जणांची बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी विक्रमच्या घरीच हे सहा जण थांबले होते. तिथेच या सहा जणांनी सर्व कट रचला. या घटनेमागील मास्टरमाईंड कोण आहे? यावर पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरवली आहे.

‘नहीं चलेगी नहीं चलेगी.. तानाशाही नहीं चलेगी…’ अशी घोषणाबाजी या युवकांकडून करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी सागर शर्मा हा लखनऊचा तर मनोरंजन हा कर्नाटकातील बेंगळुरूचा रहिवासी आहे. तर, संसदेबाहेर अटक करण्यात आलेली महिला नीलम कौर ही हरियाणाच्या जिंद येथील रहिवासी आहेत. तर, २५ वर्षीय अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Parliament Security Breach
Lok Sabha Security Breach: धमकी खरी ठरवल्यानंतर पन्नूने जाहीर केली संसदेतील घुसखोरांसाठी 10 लाखांची मदत

हे चौघेही एकमेकांना आधीच ओळखत असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. या कटामागे आणखी दोन जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांचा शोध दिल्ली पोलिस घेत आहेत. अमोल शिंदे हा पोलीस चौकशीत सकारात्मक उत्तर देत नाही

या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांची नावे समोर आली आहे. पोलिसांना काही लोकांचे मोबाईल सापडले नाहीत, त्यांची चौकशी सुरु आहे. आरोपींच्या मोबाईल जप्तीतून बऱ्याच गोष्टी बाहेर येऊ शकतात, यांची चौकशी पोलिस करीत आहेत.

अमोल, सागर, विक्रम, ललित, मनोरंजन, नीलम अशी सहा जणांची नावे समोर आली आहेत. आम्ही विद्यार्थी आहोत. बेरोजगार आहोत. हे सरकार हुकूमशाही करत असल्याचे देखील नीलमने सांगितले.

सरकारला संसदेची सुरक्षा व्यवस्था ठेवता येत नसेल तर देशाची सुरक्षा कशी ठेवता येईल?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केंद्र सरकारवर टीका केला आहे.

Parliament Security Breach
Parliament Security Breach : लोकसभा घुसखोरी प्रकरणात लातूर कनेक्शन; अमोल शिंदेंसह तीन जण ताब्यात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com