Hemant Soren Sarkarnama
देश

Exams Cancelled : मोठी बातमी! तब्बल 44 सरकारी भरती परीक्षा रद्द; विद्यार्थ्यी आंदोलनासमोर झुकले सरकार, नेमका निर्णय काय?

44 recruitment exams cancelled in Jharkhand : विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकारचा मोठा निर्णय! JPSC, JSSCसह तब्बल 44 सरकारी भरती परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Rashmi Mane

झारखंडमध्ये सरकारी भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. झारखंड सरकारने मंगळवारी (18 ऑगस्ट) रात्री तब्बल 44 भरती परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. सरकारने याबाबत 8 स्वतंत्र अधिसूचना जारी करून रद्द करण्यात आलेल्या परीक्षांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे JPSC आणि JSSC परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

सरकारच्या निर्णयानुसार, 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) तसेच आउटसोर्स एजन्सी TSR Data Processing Private Limited (TDPL) मार्फत घेण्यात आलेल्या काही परीक्षांचाही समावेश रद्द केलेल्या परीक्षांमध्ये आहे.

रद्द करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये औषध निरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, उपजिल्हाधिकारी, दंतचिकित्सक, सहाय्यक अभियंता, सिव्हिल जज, अतिरिक्त लोक अभियोजक आणि वन क्षेत्राधिकारी अशा महत्त्वाच्या पदांच्या भरती परीक्षांचा समावेश आहे. याशिवाय सरकारी पॉलिटेक्निकमधील प्रवक्ता, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक तसेच विविध प्रशासकीय आणि तांत्रिक पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांवरही या निर्णयाचा परिणाम होणार आहे.

दरम्यान, JPSC आणि JSSC मधील कथित अनियमिततेशी संबंधित प्रकरणांची जलद सुनावणी व्हावी यासाठी झारखंड उच्च न्यायालयाकडे त्वरित न्यायालये स्थापन करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच दोन्ही आयोगांमध्ये स्वतंत्र अंतर्गत दक्षता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

JPSC आणि JSSC मधील सुधारणांसाठी IAS अधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती 2 महिन्यांत सरकारला अहवाल सादरणार आहे. याआधी सरकारने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक असलेली JSSC-CGL परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. TDPL या आउटसोर्स एजन्सीने घेतलेल्या सर्व परीक्षा आणि जाहीर केलेले निकालही रद्द करण्यात आले आहेत.

दरम्यान, झारखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदित्य साहू आणि विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेणार आहे. विद्यार्थी आंदोलन, भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि CBI चौकशीची मागणी या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT