Kolhapur Water Tax : कोल्हापूरकरांवर पाणीपट्टी वाढीची टांगती तलवार!! ग्रामीण भागातील पाणीचोरीचा भुर्दंड शहराला? काय आहे 'महायुती'चा प्लॅन?

Kolhapur water bill increase 2026 : कोल्हापूरकरांवर पाणीपट्टी वाढीची टांगती तलवार. ग्रामीण भागातील पाणीचोरीचा परिणाम शहरवासीयांवर होणार का? महायुतीचा नेमका प्लॅन काय आहे, जाणून घ्या.
Kolhapur water bill increase 2026
Kolhapur water bill increase 2026Sarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुती सध्या शहरवासीयांना झटका देण्याच्या तयारीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाणी वसुलीत होणारी तफावत पाहता ही तूट भरून काढण्यासाठी महायुतीने पाणीपट्टी बिल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज होणाऱ्या महासभेत हा ठराव ठेवला जाणार आहे.

मात्र पाणी वसुलीतून होणारा फटका याबाबत कारण न शोधताच महायुती घेणारा हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडू शकतो. ग्रामीण भागात असणारी जवळपास 30 हजार पेक्षा बोगस कनेक्शनवर कारवाई करण्यापेक्षा पाणीपट्टी वाढवून ग्रामीण भागाचे पाप कोल्हापूर शहरवासी यांच्या माथ्यावर मारण्याचा प्रकार केला जाणार आहे.

Kolhapur water bill increase 2026
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने नव्या नियुक्त्या जाहीर केल्या; पुण्यात काँग्रेस-शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचा 'तोच' फॉर्म्युला

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीला शहरवासीयांनी सत्तेच्या चाव्या दिल्या. सत्तेवर येताच पाणीपट्टी बिल वाढवण्याचा निर्णय महायुती घेण्याच्या तयारीत आहे. सध्या महानगरपालिका एक ते वीस हजार लिटर मागे 9 रुपये 50 पैसे इतका दर आकारते. तर सध्याचा प्रस्तावित दर 24 रुपये 20 पैसे इतका असणार आहे. 21 ते 40 हजार लिटर पर्यंत हा दर 16 रुपये 65 पैसे आहेत तर प्रस्तावित दर 30 रुपये 25 पैसे आहे. व्यावसायिक पाणी बिल हे 46 रुपये तर प्रस्तावित तर 67 रुपये इतका आहे.

सध्याची कोल्हापूरची परिस्थिती पाहिली तर दररोज पाणी उपसा हा 200 एम एल डी इतका आहे. त्यातील 80 एम एल डी पाणी हे चोरी होते. तर साठ एमएलडी पाणी हे गळतीने वाया जाते. तर प्रत्यक्ष 60 एम एल डी चे पाणी बिल होते. त्यातून महानगरपालिकेला केवळ 48 कोटी मिळतात. शहरावर होणाऱ्या पाणीपुरवटीचा वीज बिल आणि देखबालीचा खर्च हा महापालिकेच्या तिजोरीतून केला जातो. मात्र अद्यापही महापालिकेला पाणी वसुलीतून उत्पन्न मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.

कोल्हापूर शहराच्या उपनगरातील नगरांना जोडून ग्रामीण भागाची हद्य सुरू होते. ग्रामीण भागाला जोडून अनेक नवीन कॉलनी उदयास आल्या आहेत. भागात महानगरपालिकेचे पाणी कनेक्शन देण्यास मनाई आहे. तर नागदेवाडी, बालिंगा,पाडळी, शिंगणापूर यासारख्या गावांनी अद्याप या ठिकाणी पाणीपुरवठ्याची व्यवस्था न केल्याने महापालिकेच्या हद्दीतून अनेकांना पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे एका फुलेवाडी रिंग रोडवर जवळपास 30 हजार पेक्षा जास्त बोगस नळ कनेक्शन आहेत. या नळ धारकांवर कारवाई करू नये यासाठी शहराशेजारील आमदारांचा दबाव आहे.

Kolhapur water bill increase 2026
Pune Police : भाडेकरू ठेवलाय पण 'ती' एक चुक भोवली! पुण्यात १५० हून अधिक घरमालकांवर गुन्हे दाखल!

सध्या महापालिका अधिकारांचा वापर करून बोगस नळ धारकांवर कारवाई करून गुन्हे दाखल करू शकते? ज्या ठिकाणी पाण्याची गळती आहे ती गळती पूर्णपणे बंद करू शकते? यापूर्वी झालेल्या नगरसेवकांनी भविष्याचा विचार करून अनेकांनी स्वतःच्या लेआउटला पाणी कनेक्शन नेऊन ठेवले आहे. शिवाय जी बोगस नळ धारक आहेत त्यांना पाणी कनेक्शनला मंजुरी देऊन त्यांचे उत्पन्न वाढवू शकते? मात्र हे न करता शहरवासीयांच्या माथ्यावर पाणी बिल वाढवून त्यांना भुर्दंड देण्याचा निर्णय महायुती घेण्याच्या तयारीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com