भोपाल : पद मिळवण्यासाठी राजकारण (Politics) काय केलं जाईल सांगता येत नाही. असाच एक प्रकार मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका गावात घडला आहे. या गावाची निवडणूक (Election) जाहीर झाल्यानंतर गावकऱ्यांनी मिळून थेट सरपंच पदाचा (Sarpanch Post) लिलावच केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पदासाठी सर्वाधिक 44 लाखाची बोली लावणाऱ्या सरपंचपद बहाल करण्यात आले.
राज्यातील अशोकनगर जिल्ह्यातील भातौली गावामध्ये हा प्रकार घडला आहे. या गावाने सरपंच पदाचा लिलाव करण्याची नवी पध्दत सुरू केली आहे. सरपंच पदासाठी गावात कोणताही ताणतणाव निर्माण होऊ नये, यासाठी हा मार्ग काढल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ही पध्दत पुढारलेली आहे. कारण यामुळे उमेदवार मतदारांना मतांसाठी दारू किंवा पैसे देणार नाही, हे निश्चित आहे.
गावातील मंदिरात झालेल्या लिलावामध्ये चार जण सहभागी झाले होते. त्यामध्ये सौभाग सिंग यादव (Saubhag Singh Yadav) यांनी सर्वाधिक 44 लाखांची बोली लावत पद मिळवलं. या लिलावासाठी कमीत कमी 21 लाखांची बोली निश्चित कऱण्यात आली होती. ही बोली 43 लाखांपर्यंत पोहचल्यानंतर यादव यांनी 44 लाखाची बोली लावत सरपंचपद पदरात पाडून घेतले. यानंतर गावकऱ्यांनी यादव यांचे अभिनंदन करत त्याबाबत अधिकृत घोषणा केली.
ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. या प्रक्रियेत यादव यांच्याविरोधात कुणीही उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. यादव हे 44 लाख रुपये जमा करण्यात अपयशी ठरले तर त्यांच्या खालोखाल बोली लावलेल्या नागरिकाला सरपंचपद दिले जाईल, असं ठरवण्यात आलं आहे. हे पैसे मंदिरासाठी दिले जाणार असल्याचे यादव यांनी सांगितले.
दरम्यान, प्रशासनाने ही पध्दत योग्य नसल्याचे म्हटले आहे. याविषयी बोलताना एक अधिकारी म्हणाले, निव़डणूक प्रक्रिया नियमानुसारच पार पडेल. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एक अर्ज राहिल्यास सरपंच म्हणून त्यांची निवड होईल. त्यामध्ये बोली लावणारेही असू शकतील. राज्यात जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांत पंचायत निवडणुका होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.