उद्धव ठाकरेंनी दिला रामदास कदम यांच्यासह आमदारपुत्राला झटका

कदम यांना वादग्रस्त ऑडियो क्लीप प्रकरण चांगलेच भोवताना दिसत आहे.
Ramdas Kadam & Yogesh Kadam
Ramdas Kadam & Yogesh KadamSarkarnama
Published on
Updated on

रत्नागिरी : शिवसेनेचे (Shiv Sena) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना वादग्रस्त ऑडियो क्लीप प्रकरण चांगलेच भोवताना दिसत आहे. कदम यांच्यासह त्यांचे आमदारपुत्र योगेश कदम (Yogesh Kadam) यांचे पंख छाटण्यास सुरूवात झाली असून परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना बळ दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पक्षातील रामदास कदम समर्थकांना बाहेरचा रस्ता दाखविला जात असल्याचे समजते. शिवसेना पदाधिकार्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून कदम यांच्या समर्थकांना त्यात स्थान दिलेले नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्यामागे ठाकरे हे ठामपणे उभे असल्याचा संदेश यातून देण्यात आल्याचे मानले जात आहे.

Ramdas Kadam & Yogesh Kadam
मोठी बातमी : मुलींच्या लग्नाचे वय वाढणार... मंत्रिमंडळाने दिली मंजूरी

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर कदम यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना स्थान नाही, हे पुन्हा एकदा ठाकरे यांनी दाखवून दिल्याची चर्चा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्या निवडणुकांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र भाजप विरोधात लढतील, अशी शक्यता आहे. या संदर्भात शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्थानिक खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्याशीही चर्चा झाल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्यांमध्ये उत्तर रत्नागिरी उपजिल्हाप्रमुखपदी राजू निगुडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दापोली विधानसभेच्या क्षेत्रप्रमुखपदी किशोर देसाई, तालुका प्रमुखपदी ऋषिकेश गुजर, मंडणगड तालुका प्रमुखपदी संतोष गोवले, दापोली शहर प्रमुखपदी संदीप चव्हाण, उपशहर प्रमुखपदी विक्रांत गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Ramdas Kadam & Yogesh Kadam
अखेर गंभीर आरोपांनंतर भाजपच्या नेत्याचा मंत्रिपदाचा राजीनामा

दरम्यान, रामदास कदम व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यात झालेले कथित मोबाईल संभाषण उघड झाले. त्यानंतर दापोली व मंडणगड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडीचे अधिकार आमदार योगेश कदम यांना न देता, ते अन्य नेत्यांना देण्यात आले आहेत.

दापोली व मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाली आहे. शिवसेनेने या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर दिली असून येथील माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या निवासस्थानी येऊन संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांनी मंगळवारी (ता. 7 डिेसेंबर) उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले होते. आमदार कदमांना डावलून हे एबी फॉर्म देण्यात आल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना धक्का बसला होता. त्यानंतर आता नियुक्त्यांमध्ये कदम यांना डावलण्यात आल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com