Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. पाकिस्तानी व्हिसा असलेल्या नागरिकांना तातडीने देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. त्यात दीर्घकालीन व्हिसाधारक आणि हिंदू व्हिसाधारकांना वगळण्यात आले आहे. मात्र, यानंतर आता भाजप खासदाराने केलेल्या धक्कादायक दाव्याने खळबळ उडाली आहे.
भाजपचे खासदार निशीकांत दुबे यांनी एक्सवर एक पोस्ट करत मोठा दावा केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानी दहशतवादाचा एक नवा चेहरा आता समोर आला आहे. जवळपास पाच लाखांहून अधिक पाकिस्तानी मुली भारतात लग्न करून इथेच राहत आहेत. आजपर्यंत त्यांना भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही. देशात घुसलेल्या या शत्रूंशी कसे लढणार, असा सवाल दुबेंनी केला आहे.
पाकिस्तानी नागरिक भारतात राहत असल्याच्या मुद्द्यावर एएनआय वृत्तसंस्थेशी बोलतानाही दुबे म्हणाले, व्हिसा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोन प्रकारचे व्हिसा समोर आले आहेत. त्याची खोलवर चौकशी होण्याची गरज आहे. पाकिस्तानी मुली इथे लग्न करत आहेत पण भारतीय नागरिक झालेल्या नाहीत. अनेक वर्षांपासून बारतात राहत आहेत.
पाकिस्तानी पुरूषही भारतात येऊन लग्न करतात. या विवाहांमागचा त्यांचा नेमका उद्देश काय आहे, याचा तपास करायला हवा. या देशांमध्ये त्यांच्यायोग्य जोडीदार नाहीत का? 1947 मध्ये जे पाकिस्तानात गेले त्यांची भारतातील संपत्ती शत्रू संपत्ती कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आली आहे. याचा अर्थ असा नाही की पाकिस्तानातील मुलींना भारतातील मुलांशी लग्न करावे किंवा भारतातील मुलींनी पाकिस्तानात जाऊन लग्न करावे. यामधून आपल्या मार्ग काढावा लागेल, असेही दुबे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देशातील बहुतेक राज्यांतून पाकिस्तानी व्हिसा असलेल्या नागरिकांना परत पाठविण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. महाराष्ट्रातील सर्व व्हिसाधारक पाकिस्तानी नागरिकांचे ट्रॅकिंग पूर्ण झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. किती पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्यात आले, याची माहिती लवकरच पोलिसांकडून दिली जाईल, असेही फडणवीसांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.