Bhopal IAS Land Scam : बीडमधील माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी भुसंपादनामध्ये केलेले घोटाळे आता सर्वांसमोर आले आहेत. अशातच आता एक दोन नव्हे तर तब्बल देशभरातील तब्बल ५० आयएएस आणि आपीएस अधिकाऱ्यांनी मिळून एका ठिकाणी जमिनीमध्ये केलेल्या गुंतवणुकीची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या ५० अधिकाऱ्यांनी भोपाळमध्ये केलेलं हे भूसंपादनाचं कांड अविनाश पाठक यांनी केलेल्या भुसंपादनाच्या घोटाळ्यापेक्षा कितीतरी पटीने मोठं आहे. शिवाय हे प्रकरण समोर आल्यामुळे आपल्या ओळखीचं नेटवर्क तयार करणं आणि ज्या भागातून विविध प्रकल्प जाणार तिथे मोठी गुंतवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे.
महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, मध्य प्रदेश अशा देशभरातील विविध राज्यातील ५० आयएएस आणि IPS अधिकाऱ्यांनी मध्य प्रदेशातील भोपाळ जवळील कोलार क्षेत्रातील गुराडी घाटातील एक गाव निवडलं आणि तिथे ४ एप्रिल २०२२ रोजी पाच एकर जमीन ५.५ कोटी रूपयांमध्ये खरेदी केली.
या अधिकाऱ्यांनी ही जमीन खरेदी केली तेव्हा तिचा दर ८१. ७५ रुपये प्रति चौरस फूट होता. मात्र त्यांनी ही जमीन खरेदी केलल्यानंतर १६ महिन्यातच तिथून एका ३२०० कोटींच्या वेस्टर्न बायपासची घोषणा करण्यात आली. हा बायपास त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावरून जातो. त्यामुळे साहजिकच या जमिनीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली.
त्यानंतर जून २०२४ मध्ये जेव्हा प्रत्यक्ष या बायपासला मंजूरी मिळाली तेव्हा या जमिनीचा दर ८१. ७५ रुपयांवरून तब्बल ५५७ रुपये प्रति चौरस फुटांवर पोहोचला. त्यामुळे ५ कोटींच्या जमिनीचा दर जवळपास १२ कोटी १३ लाख १४ हजार ६०० रुपयांवर पोहोचला. तर सध्या या जमिनीचा दर २५०० ते ३००० रुपये प्रति चौरस फूट आहे. त्यामुळे आता या अधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या जमिनीची किमंत ५५ कोटी ते ६५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
शिवाय जून २०२४ मध्ये या जमिनीच्या वापरात बदल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण आधी या जमिनीचा दर्जा शेतजमीन वापर असा होता. मात्र बायपास मंजूर झाल्यावर १० महिन्यांनी म्हणजे जून २०२४ मध्ये जमिनीच्या वापरात बदल करत तिचा दर्जा निवासी वापरासाठी करण्यात आला. त्यामुळे आता हा शेतजमीन ते निवासी जमिनीच्या दर्जाच बदल आपोआप झाला की अधिकाऱ्यांनी तो बदल करून घेतला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवाय देश सेवा आणि जनतेचं भलं करण्यासाठी UPSC आणि MPSC ची परीक्षा देऊन प्रशासकीय सेवा करणारे अधिकारी आता स्वत:च्या भल्यासाठी आणि स्वार्थसाठी आपल्या असलेल्या माहितीचा आणि अधिकाराचा गैरवापर केला का? आणि केला असेल तर आता या अधिकाऱ्यांवर सरकारकडून काही कारवाई केली जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.