Baby born in train : माणुसकीचं दर्शन! टीटीई आणि नर्सच्या मदतीने धावत्या रेल्वेत महिलेची सुखरूप प्रसूती

Baby Born in Kushinagar Express : कल्याण स्थानक सुटल्यानंतर एका प्रवाशाने जनरल डब्यातील गर्भवती महिलेला तीव्र प्रसूती वेदना होत असल्याची माहिती त्यांना दिली. डब्यात प्रचंड गर्दी असल्याने महिलेची अवस्था अधिकच बिकट होत होती. क्षणाचाही विलंब न करता तेली यांनी काही प्रवाशांच्या मदतीने महिलेला कसारा स्थानकात ए-१ डब्याच्या कॅरी डोअरजवळ आणले.
Kushinagar Express Delivery | Baby Born in Running Train
A newborn baby girl was safely delivered inside the moving Kushinagar Express after a TTE and a nurse acted quickly during the emergency train delivery.Sarkarnama
Published on
Updated on

नितीन बिनेकर

Mumbai News, 12 May : लोकमान्य टिळक टर्मिनसहून भुसावळकडे जाणाऱ्या कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये रविवारी एक हृदयस्पर्शी घटना घडली. प्रचंड गर्दीच्या जनरल डब्यात प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या.

परिस्थिती गंभीर होत असतानाच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आणि एका नर्सच्या मदतीमुळे धावत्या ट्रेनमध्येच महिलेची सुखरूप प्रसूती झाली आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ट्रेन क्रमांक २२५३८ कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये आर. एस. तेली हे सीटीआय म्हणून एलटीटी ते भुसावळ दरम्यान ड्युटीवर होते.

कल्याण स्थानक सुटल्यानंतर एका प्रवाशाने जनरल डब्यातील गर्भवती महिलेला तीव्र प्रसूती वेदना होत असल्याची माहिती त्यांना दिली. डब्यात प्रचंड गर्दी असल्याने महिलेची अवस्था अधिकच बिकट होत होती. क्षणाचाही विलंब न करता तेली यांनी काही प्रवाशांच्या मदतीने महिलेला कसारा स्थानकात ए-१ डब्याच्या कॅरी डोअरजवळ आणले. याचवेळी ट्रेनमध्ये प्रवास करणारी एक नर्स मदतीसाठी पुढे आली.

Kushinagar Express Delivery | Baby Born in Running Train
Popat Deshmukh Death : दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या मुलाचे निधन : आमदार बाबासाहेब देशमुख यांना पितृशोक

तिच्या सहाय्याने ट्रेनमध्येच महिलेची नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आली. काही क्षणांतच चिमुकलीचा पहिला आवाज संपूर्ण डब्यात घुमला आणि प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. घटनेची माहिती तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर इगतपुरी स्थानकात रुग्णवाहिका, डॉक्टर, स्ट्रेचर आणि रेल्वे अधिकाऱ्यांची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली.

Kushinagar Express Delivery | Baby Born in Running Train
NCP Executive List : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतून पटेल, तटकरे अन् भुजबळांना का वगळलं? सुनेत्रा पवारांनी दिलं स्पष्टीकरण

ट्रेन इगतपुरीत पोहोचताच आई आणि नवजात बालिकेला रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. रेल्वे कर्मचाऱ्यांची संवेदनशीलता, प्रवाशांचे सहकार्य आणि नर्सच्या तत्परतेमुळे धावत्या ट्रेनमध्ये एका नव्या जीवाचे सुरक्षित आगमन झाल्याने प्रवाशांकडून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com