Amrut Bharat Station Scheme Sarkarnama
देश

Amrut Bharat Station Scheme : देशातील ५०८ रेल्वे स्थानकांचे रूप पालटणार; एवढे आहे बजेट?

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या नुतनीकरणाचे आणि पुर्नविकासाची पायाभरणी होणार आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (6 जुलै) सकाळी 11 वाजता देशभरातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे.

ही 508 रेल्वे स्टेशन 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेली आहेत.यात उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये 55-55, बिहारमध्ये 49, महाराष्ट्रात 44, पश्चिम बंगालमध्ये 37, मध्य प्रदेशमध्ये 34, आसाममध्ये 32, ओडिशामध्ये 25, पंजाबमध्ये 22, गुजरातमध्ये 21-21 आणि तेलंगणा, झारखंडमध्ये 20, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 18, हरियाणामध्ये 15 आणि कर्नाटकमध्ये 13. यासह चंदीगडमध्ये 8, केरळमध्ये 5, दिल्ली, त्रिपुरा, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये 3-3 स्थानके, तर हिमाचल प्रदेश, मेघालय, नागालँड आणि पुद्दुचेरीमध्ये 1-1 स्थानके पुनर्जीवित केली जाणार आहेत.

पुनर्विकासाचे हे कार्यक्रम अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत केले जाणार असून याचे बजेट २४ हजार ७०० कोटी रुपये आहे. या प्रकल्पात 1300 रेल्वे स्थानके मल्टी-मॉडल हब म्हणून विकसित केली जाणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात 508 रेल्वे स्थानकांवर काम केले जाणार आहे.

विशेष म्हणजे या सर्व रेल्वे स्थानकांवर स्थानिक संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे. शहरांची दोन्ही टोकांचा योग्यरित्या विकास करून ही स्टेशन्स शहरातील केंद्रस्थान बनवण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला जात आहे. ही स्थानकांवर स्थानिक संस्कृती, वारसा आणि स्थापत्यकलेची झलक पाहायला मिळणार आहे. तसेच प्रवाशांच्या आधुनिक सुविधांची काळजी घेतली जाणार आहे.

ही स्थानके जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दोन वर्षांत ही स्थानके पूर्णपणे बदललेली दिसणार आहेत. प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधांसोबतच ट्रेनच्या लोको पायलटसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज अशी रनिंग रूमही असेल.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT