केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींकडे लागले आहे. नवीन वेतन आयोगामुळे पगार, पेन्शन आणि थकबाकीत मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, 2.57 फिटमेंट फॅक्टरच्या चर्चेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये एरिअरबाबतही उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, काही दिवसापूर्वीच 8 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या कामकाजासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली होती. त्यामध्ये आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध माहितीनुसार, मुंबई दौऱ्याबाबत कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. माहितीनुसार, 22 आणि 23 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या दौऱ्यात विविध संघटना, संस्था तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांशी संबंधित संघ आणि युनियनच्या प्रतिनिधींशी आयोगाकडून चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांशी संबंधित मागण्या मांडण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरू शकते.
8व्या वेतन आयोगा संदर्भात कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारकांकडून विविध मागण्या मांडल्या जात आहेत. आयोगाचे सदस्य देशातील विविध शहरांमध्ये बैठका घेत असून, यामध्ये सरकारी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच निवृत्ती वेतनधारक आपल्या मागण्या आणि सूचना मांडत आहेत. मात्र, फिटमेंट फॅक्टर किती निश्चित होईल, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
दरम्यान, 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास वेतनात मोठी वाढ होऊ शकते, असा दावा केला जात आहे. याच आधारावर 8th Pay Commission arrears किती मिळू शकतात, याची गणिते चर्चेत आली आहेत. उपलब्ध माहितीनुसार, Level 8 मधील कर्मचाऱ्यांचे सध्याचे basic pay 47,600 असल्यास 2.57 च्या गुणकानुसार ते सुमारे 1,22,332 होऊ शकते.
याच अंदाजानुसार हातातील पगार सुमारे 74,732 होण्याची शक्यता मांडली जात आहे. जर नवीन वेतन आयोग लागू होण्यासाठी 24 महिन्यांचा कालावधी लागला, तर या कालावधीतील वेतनातील फरकाची थकबाकी सुमारे 17,93,568 म्हणजेच जवळपास 18 लाखांपर्यंत जाऊ शकते.
मात्र, हा अधिकृत एरिअरचा आकडा नाही. प्रत्यक्ष रक्कम सरकारचा अंतिम फिटमेंट फॅक्टर, वेतनश्रेणी, लागू होण्याची तारीख आणि अंतिम नियमांवर अवलंबून असेल. त्यामुळे 8व्या वेतन आयोगाच्या निर्णयाकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.