Tribal Education : धक्कादायक; आश्रम शाळांच्या मुलींना प्रेग्नेंसी टेस्ट सक्ती, प्रशासनाचा विचित्र फतवा? पालक-विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप!

Maharashtra ashram school girls pregnancy test controversy : महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांतील विद्यार्थिनींच्या प्रेग्नेंसी टेस्टबाबत आरोप समोर आले आहेत. नेमकं प्रकरण काय? प्रशासनाची भूमिका आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या.
Tribal Education pregnancy test controversy
Tribal Education pregnancy test controversy
Published on
Updated on

Tribal Education pregnancy test controversy : राज्यातील आदिवासी आश्रम शाळांची दुरावस्था आणि विद्यार्थ्यांची हेळसांड आंदोलनाचा विषय बनला आहे. या संदर्भात राज्यभर विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. त्यात एका धक्कादायक प्रकाराची भर पडली आहे. राज्यातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींवर सुट्टी वरून परतल्यावर प्रेग्नेंसी टेस्ट करणे सक्तीचे करण्यात आले आहे. गेले काही दिवस हा वादाचा विषय बनला होता. आता त्यावरून विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचा स्पोर्ट झाला आहे.

आदिवासी आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी प्रामुख्याने अल्पवयीन असतात. त्या सणासुदीला किंवा अन्य वेळी सुट्टीवर गेल्यास आपल्या कुटुंबीयांमध्ये जातात. घरून पुन्हा शाळेत येताना त्यांना ही वैद्यकीय सक्ती करण्यात आली आहे.

Tribal Education pregnancy test controversy
Girish Mahajan : कृषिमंत्र्याच्या आधीच गिरीश महाजन पोहोचले बांधावर; शेतकरी म्हणाले, घोषणा नको मदत द्या!

आदिवासी आश्रम शाळांमध्ये नियमित शैक्षणिक रजा, सुट्ट्या असतात. या कालावधीत आश्रम शाळांतील विद्यार्थिनी आपल्या घरी जातात. अशावेळी तेरा वर्षांवरील विद्यार्थिनींना परत येताना प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा अन्य शासकीय रुग्णालयातून स्वतः प्रेग्नेंसी टेस्ट करून घ्यावी लागते. त्यामुळे अनेकदा अपमान जनक भावना निर्माण होते, अशी खंत पालक आणि या विद्यार्थिनींनी व्यक्त केली आहे.

अन्य होस्टेल्स किंवा विद्यापीठांच्या वस्तीगृहात वयस्कर विद्यार्थिनी असतात. तेथे देखील अशा प्रकारची सक्ती किंवा नियम नाही. फक्त आदिवासी आश्रम शाळांसाठीच हा नियम आहे. त्यामुळे हा आदिवासींचा अवमान आहे. त्याचा तातडीने फेरविचार होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया भारतीय आदिवासी पॅंथर संघटनेचे उपाध्यक्ष तुळशीराम खोटरे यांनी दिली.

Tribal Education pregnancy test controversy
Online Fraud : जिल्हाधिकाऱ्यांच्या अपघाताचा बनाव करुन मागितले पैसे, तलाठ्याची 12 हजारात ऑनलाइन फसवणूक

यासंदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे. विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी केली जाते. प्रेग्नेंसी टेस्ट केली जात नाही असा दावा मंत्र्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com