8th Pay Commission  sarkarnama
देश

8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगामुळे किती वाढणार पगार, कधी होणार लागू? वाचा सविस्तर...

Central Government Decision Government Salary Pay Commission Update 2025 : केंद्र सरकारच्या जवळपास 50 लाख कर्मचाऱ्यांना या शिफारशींचा फायदा होणार आहे. तसेच सुमारे 65 लाख पेंशनधारकांच्या पेंशनमध्येही वाढ होणार आहे.

Rajanand More

New Delhi News : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे. त्याला कारण ठरला आहे आठवा वेतन आयोग. सरकारने गुरूवारी या आयोगाची स्थापना करण्यास मंजूरी दिली आहे. या आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ होणार आहे. निवृत्ती वेतनधारकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

आयोगाचे अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती लवकरच केली जाणार आहे. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच आठव्या आयोगाच्या शिफारशी सरकारला प्राप्त होतील. केंद्र सरकारच्या जवळपास 50 लाख कर्मचाऱ्यांना या शिफारशींचा फायदा होणार आहे. तसेच सुमारे 65 लाख पेंशनधारकांच्या पेंशनमध्येही वाढ होणार आहे.

एकट्या दिल्लीमध्ये सुमारे चार लाख कर्मचारी आहेत. दिल्ली सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतना केंद्रीय वेतन आयोगानुसार वाढ होते. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी पुढील वर्षीच लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळण्यासाठी एक ते दीड वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

वेतनवाढीचा फॉर्म्यूला

सातव्या वेतन आयोगाच्या फॉर्म्यूल्यानुसार कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतन 7 हजारवरून 17 हजार 990 निश्चित करण्यात आले होते. हाच फॉर्म्यूला ग्रहित धरला तर आठव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचे कमीत कमी बेसिक वेतन 26 हजार होऊ शकते. कर्मचारी संघटनांसह इतर संघटनांकडून तब्बल 180 टक्के वेतनवाढीची मागणी केली जात आहे.

आठव्या वेतना आयोगामध्ये किमान आधार वेतन वाढून 34 हजार 650 रुपये केले जाऊ सकते. तर पेंशन 9 हजारांनी वाढून 17 हजार 280 रुपये वाढ होऊ शकते. हा केवळ अंदाज आहे. त्यामुळे आठवा वेतन आयोग वेतनवाढीसाठी कोणता फॉर्म्यूला निश्चित करणार यावरच वेतनवाढ अवलंबून असणार आहे.

किती वर्षांनी होतो आयोग?

सर्वसाधारणपणे केंद्र सरकारकडून दर दहा वर्षांनी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीसाठी वेतन आयोगाची स्थापना केली जाते. 1947 पासून आतापर्यंत सात वेतन आयोगांची स्थापना करण्यात आली आहे. लवकरच आठवा वेतन आयोग स्थापन होईल. केंद्रासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन संरचना, लाभ आणि भत्ते निश्चित करण्यात वेतन आयोगाची महत्वाची भूमिका असते.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT