Arvind Kejriwal Letter : केजरीवालांचे ‘लेटर पॉलिटिक्स’; मोदींकडे केली मोठी मागणी, भाजप लगेच घोषणा करणार?

PM Narendra Modi Delhi Assembly Election : दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
Arvind Kejriwal, Narendra Modi
Arvind Kejriwal, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : दिल्ली विधानसभा निवडणुकीची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. तरुण मतदारांना डोळ्यासमोर ठेवून केजरीवालांनी ‘लेटर पॉलिटिक्स’ केल्याची चर्चा आहे.

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत केजरीवाल यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी दिल्ली मेट्रोत 50 टक्के सवलत देण्याची मागणी केली आहे. दिल्ली मेट्रोमध्ये केंद्र आणि दिल्ली सरकारचाही हिस्सा आहे. त्यामुळे सवलतीचा भार दोन्ही सरकार उचलू शकतात, असे केजरीवालांनी पत्रात म्हटले आहे. विद्यार्थ्यांसाठी आपण मोफत बस योजना तयार करत असल्याचेही केजरीवालांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Arvind Kejriwal, Narendra Modi
Delhi Election: दिल्लीत AI ठरतेय EC ची डोकेदुखी! निवडणूक आयोगाकडून सूचना

काय आहे पत्रात?

मी दिल्लीतील शाळा आणि काँलेजचे विद्यार्थ्यांशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यांकडे तुमचे लक्ष आकर्षित करण्यासाठी पत्र लिहित आहे. दिल्लीतील विद्यार्थी शाळा-कॉलेजमध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेट्रोवर अवलंबून आहेत. त्यांच्यावर पडणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी मी दिल्ली मेर्टोत 50 टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव ठेवत असल्याचे केजरीवालांनी पत्रात म्हटले आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये राज्य व केंद्र सरकारचा 50-50 टक्के वाटा आहे. त्यामुळे दोघांनीही अर्धा खर्च उचलावा. तुम्ही या प्रस्तावाला संमती द्या, अशी अपेक्षा केजरीवालांनी पंतप्रधानांकडे व्यक्त केली आहे. दरम्यान, केजरीवालांकडून निवडणुकीच्या तोंडावर विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली जाऊ शकतो. तसा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.

Arvind Kejriwal, Narendra Modi
Justin Trudeau: भारतासोबतची दुश्मनी नडली, पंतप्रधानपद गमावलेल्या ट्रुडोंनी पंधरा दिवसांच्या आतच घेतला दुसरा मोठा निर्णय

भाजपकडून आज जाहीरनामा प्रसिध्द केला जाणार आहे. यापार्श्वभूमीवर केजरीवालांनी मोदींना लिहिलेल्या पत्रालाही महत्व प्राप्त झाले आहे. केजरीवालांच्या मागणीप्रमाणे भाजपकडून आपल्या जाहीरनाम्यात मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना प्रवासासाठी सवलत देण्याची घोषणा होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. भाजपकडून तशी घोषणा न केल्यास केजरीवालांकडून पत्राचा दाखला देत भाजपसह मोदींवर निशाणा साधला जाऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com