Delhi : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यात भाजपकडून राज्यात पुन्हा एकदा तीनशे पारचा नारा दिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी होणार असल्याचा दावाही भाजप नेतेमंडळींकडून करण्यात येत आहे.
याचवेळी मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी विविध पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. याचवेळी मागील वर्षी भाजप सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पुकारलेल्या लढ्यातून चर्चेत आलेल्या शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोठं विधान केलं आहे.
भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait)यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली.यावेळी त्यांनी मोदींच्या पंतप्रधानपदासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. टिकैत म्हणाले, लोकसभा 2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होतील. पण मोदी आपला पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण करु शकणार नाहीत. कारण ते मध्येच पदावरुन पायउतार होतील असं खळबळजनक दावा टिकैत यांनी केला आहे.
कारण मोदींना देशाचं राष्ट्रपतीही बनायचंय..
"नरेंद्र मोदीं(Narendra Modi) ना आम्ही हटवणार नाही; तर मोदी स्वत: पंतप्रधानपदावरुन बाजूला होतील. याचं कारण मोदींना देशाचा राष्ट्रपतीही बनायचं आहे असंही टिकैत यावेळी म्हणाले. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
...म्हणून आता योगींना पंतप्रधान बनवा!
राकेश टिकैत यांनी मोदींनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करण्यात यावं असं विधान केलं आहे.पंतप्रधान मोदीनंतर कोण? या प्रश्वावर टिकैत म्हणाले, मोदीनंतर योगींना पंतप्रधान बनवा. मोदींपेक्षा तर बरे आहेत. तसंच "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांना काम केलं जाऊ देत नाही. तसेच त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला जात आहे असा दावाही टिकैत यांनी केला आहे.
...तोच पुढील पंतप्रधान होईल!
लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत राहुल गांधी(Rahul Gandhi),नरेंद्र मोदी या दोघांपैकी कोण पंतप्रधान व्हायला हवं? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर टिकैत म्हणाले,आमच्या बोलण्यामुळे कोण कोणाला पंतप्रधान करणार नाही. या दोघांपैकी ज्या कोणाला लोक निवडतील, तोच पुढील पंतप्रधान बनणार आहे. तसेच ज्यांनी व्यवस्थेवर नियंत्रण मिळवलं आहे, तोच पुढील पंतप्रधान होईल असाही दावा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.