Bjp : केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने शहरातील वाळूजमध्ये २०० तर शेंद्रात ३० खाटाचे ईएसआयसी हॉस्पिटल उभारण्यास मंजूरी दिली आहे. (Central Minister Bhupendra Yadav) या दोन्ही औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची वाढती संख्या लक्षात घेत केंद्राने हा निर्णय घेतला आहे. तसेच जास्त जागा उपलब्ध झाल्यास खाटांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय कामगारमंत्री भुपेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली. २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान पुन्हा मोदीच होणार आहेत, जनतेचाच तसा आग्रह असल्याचा दावा देखील यादव यांनी यावेळी केला.
मोदी सरकारने ९ वर्षात राबविलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी ते रविवारी शहरात आले होते. (Bjp) यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार कल्पना सैनी, आमदार प्रशांत बंब आदींची प्रमुख उपस्थिती होती. यादव म्हणाले, मागील ७५ वर्षात देशात ९१ हजार किलो मीटरचेच रस्ते तयार झाले. जेव्हा की, केंद्रातील मोदी (Narendra Modi) सरकारने केवळ ९ वर्षातच ५८ हजार किलो मीटरचे रस्ते तयार केले आहेत.
एवढेच नव्हे तर ७५ वर्षात जेवढे एअरपोर्ट झाले, तेवढेच म्हणजे ७४ नवीन एअरपोर्ट मागील ९ वर्षात तयार केले. मोदी सरकारने सर्व सेवा डिजीटल सुविधांशी जोडल्या असून देशात व्यापार, उद्योग क्षेत्राचा विकास होऊन अर्थ व्यवस्था बळकट झाली आहे. (Marathwada) कर्नाटक विधानसभा निवडणूकीसारखी स्थिती लोकसभा निवडणूकीत होणार नाही. उलट देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्ता यावी, यासाठी मतदारच आग्रही असल्याचा दावा यादव यांनी केला.
हिंगोली, छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यात हेच चित्र दिसले असून या लोकसभा मतदार संघात भाजपसाठी पोषक वातावरण असल्याचा विश्वास यादव यांनी व्यक्त केला. भाजपने देशात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी पक्षाला चांगले वातावरण दिसत आहे. पहिल्यापेक्षा अधिक बहुमताने मोदी सरकार सत्तेत येईल. तसेच राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकास कामे सुरू असल्याने चांगले चित्र असल्याचेही ते म्हणाले.
मात्र, भाजपने शिंदे गटाच्या आमदार, खासदारांच्या मतदार संघातही संघटन बळकटीवर लक्ष केंद्रीत केल्याने नाराजीचे सूर आहे, या प्रश्नाचे उत्तर देतांना ते म्हणाले की, भाजपचा नाराच मुळात सबका साथ, सबका विकास असा आहे. त्यामुळे पक्षाने नेहमीच आपल्या मित्र पक्षालासोबत घेत काम केले आहे. परंतु, उद्धव ठाकरेंनीच आम्हाला सोडून कॉंग्रेससोबत हात मिळवणी केली, असा आरोप यादव यांनी केला. भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपचा मित्र पक्ष असेल का? असे विचारले असता स्मितहास्य करत ते तर आम्हाला पराभूत करण्यास निघाले आहेत, असे म्हणत यावर अधिक बोलणे टाळले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.