National News | Iran| Mahan Air| 
देश

अबब! भारतीय हवाई हद्दीत घुसले बॉम्ब असलेले विमान; त्यानंतर जे झालं ते...

National News | बॉम्ब असलेले हे विमान ४५ मिनिट भारतीय हवाई हद्दीत घिरट्या घालत होते.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : इराणच्या तेहरान येथून भारताच्या हवाई हद्दीत आलेल्या एका विमानात बॉम्ब असल्याची माहिती हवाईदलाला मिळाली होती. या माहितीननंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणांमध्ये तब्बल 1 तास चांगलीच खळबळ माजली होती. मात्र हवाई दलाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या महान एअरचे विमान क्रमांक W581 तेहरानहून चीनच्या ग्वांगझू शहरात जात होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांना फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी हे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत होते. काही मिनिटांतच विमानाने पाकिस्तानची हवाई हद्द पार करून भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश केला. पण त्याचवेळी, तेहरानहून उड्डाण केलेल्या विमानात बॉम्ब असण्याची शक्यता आहे आणि हे विमान दिल्लीत आपत्कालीन लँडिंग करू शकते, अशी माहिती पाकिस्तानच्या लाहोर एअर ट्रॅफिक कंट्रोलने दिल्ली एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिली.

पाकिस्तानकडून आलेल्या वृत्ताने दिल्ली विमानतळ, हवाई दल आणि भारताच्या गुप्तचर यंत्रणांना सतर्क झाल्या. बॉम्बचा धोका किंवा आपत्कालीन लँडिंग या दोन्हीसाठी दिल्ली विमानतळ तयार करण्यात आले होते. त्यानंतर विमानाच्या कर्मचाऱ्यांनीही रात्री ९.२० च्या सुमारास दिल्ली एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि विमानात बॉम्ब असल्याचे सांगत आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली.

पण दिल्ली एअर ट्रॅफिकने लगेचच भारतीय हवाई दलाला सतर्क केले. काही मिनिटांतच भारतीय हवाई दलाच्या सुखोई विमानांनी उड्डाण केले आणि विमान कोणत्याही परिस्थितीत दिल्लीत उतरु नये यासाठी इराणी विमानाला भारतीय हवाई हद्दीतच घेरले. हवाई दलाच्या सुखोई विमानांनी या विमानाला सुरक्षित अंतरावरून वेढले होते. त्यानंतर या विमानाच्या क्रूशी संपर्क साधला आणि हे विमान जयपूर किंवा चंदीगडमध्ये उतरवण्याचा पर्याय दिला.

Flightradar24 या जगभरातील उड्डाणांवर नजर ठेवणाऱ्या संस्थेने सांगितले की, या विमानाने निर्धारित उंचीवरून दोनदा खाली येण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच, विमानाने लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु हे लँडिंग होऊ शकले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT