Arag Gyanendra
Arag Gyanendra Sarkarnama
देश

संतापजनक : गृहमंत्र्यांनीच पोलिसांची तुलना केली कुत्र्यांशी!

सरकारनामा ब्यूरो

बंगळूर : कर्नाटक (Karnataka) राज्य रयत संघ आणि हसिरू सेने यांनी राज्याचे गृहमंत्री (Home Minister) अरग ज्ञानेंद्र यांनी पोलिसांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल चिक्कमंगळूर जिल्ह्यातील कोप्पा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गृहमंत्र्यांनी अपमानास्पद बोलत पोलिसांना फटकारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (A complaint has been lodged against Karnataka Home Minister Arag Gyanendra)

अरग ज्ञानेंद्र यांनी कथितपणे पोलिसांची तुलना कुत्र्यांशी केली आहे. गुरे तस्करांकडून लाच घेतात, ते पैशांसाठी काहीही करतात, असे सांगत पक्ष कार्यकर्त्यांसमोर फोनवर त्यांना फटकारले. गुरेढोरे चोरीवर कारवाई होत नसेल, तर मान उंच करून कर्तव्य कसे बजावायचे, असा सवालही त्यांनी केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावरून जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून गृहमंत्र्यांवर सर्वच स्तरातून टीका होत आहे.

गृहमंत्री अरग यांनी स्पष्ट केले की, ते त्यांच्या मूळ जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलले होते. जेथे बेकायदेशीरपणे गायींची वाहतूक करणाऱ्‍या ट्रकच्या मागे जात असताना बजरंग दलाच्या दोन गोरक्षकांवर हल्ला झाला. ट्रक चालकाने त्यांचे वाहन त्यांच्या अंगावर घालवण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांची स्थिती पाहून मला खूप दु:ख झाले होते. कर्नाटक पोलिसांनी देशात चांगले नाव कमावले आहे, परंतु काही लोक गुरे चोरी करणाऱ्या लोकांवर कारवाई करत नाहीत. गोहत्येवर संपूर्ण बंदी आणण्यावर आपले लक्ष आहे.

दरम्यान, राज्य रयत संघ आणि हसिरू सेने यांनी तक्रार केली आहे. गृहमंत्र्यांचे वक्तव्य अवमानकारक असून, त्यामुळे पोलिस खात्याची मान खाली गेली आहे. जनतेत असुरक्षितता निर्माण झाली आहे, त्यामुळे गृहमंत्री ज्ञानेंद्र यांच्यावर कारवाई करण्यात यावी, मागणी जनतेमधून केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT